शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

सर्वपित्रीला सूर्योदय तिथीचा अपवाद

By admin | Updated: September 15, 2014 04:11 IST

यंदा पंचांग, दिनदर्शिकेत मंगळवार २३ रोजी सकाळी ९.४५ पर्यंत चतुर्दशी तिथी आहे आणि सर्वपित्री श्राद्ध मंगळवारी असेल. तसेच बुधवार २४ ला सकाळी ११.४४ पर्यंत अमावस्या

सुहास शूर, जामदा (जि. जळगाव)यंदा पंचांग, दिनदर्शिकेत मंगळवार २३ रोजी सकाळी ९.४५ पर्यंत चतुर्दशी तिथी आहे आणि सर्वपित्री श्राद्ध मंगळवारी असेल. तसेच बुधवार २४ ला सकाळी ११.४४ पर्यंत अमावस्या असूनही आजेपाडवा किंवा मातामह श्राद्ध सांगितले आहे. याबाबत संभ्रम असला तरी त्याच दिवशी ती श्राद्ध करणे योग्य ठरणार असल्याचे पंचांगकर्त्यांचे म्हणणे आहे. साधारणत: धार्मिक कार्यास सूर्योदय कालीन तिथी मुख्यत्वे मानली जाते. परंतु श्राद्धतिथीचा निर्णय सूर्योदयकालीन तिथीवर नसून श्राद्ध कर्मासाठी श्राद्धाची तिथी अपराण्हकाली म्हणजे सामान्यत: दुपारी दीड ते चार या काळात ज्यादिवशी असेल त्या दिवशी सकाळी श्राद्ध तिथी नसताना सुद्धा सकाळपासून दुपारी दोन-तीन वाजेपर्यंत कोणत्याहीवेळी श्राद्धकर्म करता येते. या शास्त्रनिर्णयास अनुसरुन आहे, असे पंचांगकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार मंगळवारी अपराण्हकाली अमावस्या असल्याने सर्वपित्री श्राद्ध करणे योग्य व संयुक्तिक ठरेल. दुसऱ्या दिवशी अपराण्ह काली प्रतिपदा तिथी असल्याने ‘आजेपाडवा’ (म्हणजे वडील हयात असलेल्या मुलाने आईच्या वडिलांचे श्राद्ध करणे -मातामह श्राद्ध ) २४ सप्टेंबरला करणे योग्य राहील. दुर्गास्थापना, नवरात्रारंभ यासाठी सूर्योदयकालीन तिथी मुख्यत्वे मान्य असल्याने २५ ला सूर्योदयापासून दुपारी १.२२ पर्यंत प्रतिपदा तिथी असल्याने दुर्गास्थापना, नवरात्रारंभ २५ सप्टेंबर गुरुवार रोजी दिवसभरासाठी आहे. क्वचित प्रसंगी दुसऱ्या दिवशी सूर्योदयास द्वितीया तिथी असल्यास अमावस्था समाप्तीनंतर उशीरा घटस्थापना होते. पंचांगातील तिथी निर्णय दैवी, धार्मिक, शुभकार्यास वेगळे व श्राद्धादी कर्मास वेगळे नियम आहेत, असेही पंचांगकर्त्यांनी सांगितले.