शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

परीक्षेत महाराष्ट्र, तर निकालात कर्नाटक आघाडीवर

By admin | Updated: March 25, 2015 01:18 IST

दहावी, बारावी : उत्तरपत्रिका तपासणीसाठी स्वतंत्र केंद्र, निकाल वेळेवर लावण्याकडे विशेष लक्ष

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर प्रत्येक वर्षी दहावी, बारावीची परीक्षा घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर आणि निकाल लावण्यात पिछाडीवर राहतो. याउलट एक महिना परीक्षा उशिरा घेऊनही निकाल लावण्यात कर्नाटक आघाडीवर आहे. प्रत्येक जिल्ह्यात उत्तरपत्रिकेच्या संख्येवर तात्पुरती तपासणी केंदे्र सुरू केली जातात. त्यामुळे कर्नाटकात महिन्यात निकाल लागतो. महाराष्ट्रात निकाल लावण्यासाठी जून महिना उजाडतो. गतवर्षी महाराष्ट्रात दहावीसाठी ११ लाख ९८ हजार ८५९ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यातील १० लाख ७९ हजार ३३२ विद्यार्थी पास झाले होते. एक लाख १९ हजार ५२७ विद्यार्थी नापास झाले होते. बारावीच्या परीक्षेस एक लाख ३१ हजार ४५२ विद्यार्थी बसले. पैकी ३८ हजार ७१८ उत्तीर्ण झाले होते. ९२ हजार ७३४ विद्यार्थी नापास झाले होते. यातील दोनपेक्षा अधिक विषयांत नापास झालेल्यांचे वर्ष वाया गेल्याने मोठा फटका बसला. कर्नाटकात गेल्या वर्षी दहावीसाठी आठ लाख ३६ हजार ३४२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी सहा लाख ४७ हजार ९५४ विद्यार्थी पास झाले होते. एक लाख ८८ हजार ३८८ विद्यार्थी नापास झाले होते. बारावीसाठी सहा लाख ११ हजार ५६९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी तीन लाख ६३ हजार ५७ विद्यार्थी पास झाले. दोन लाख ४८ हजार ५१२ विद्यार्थी नापास झाले होते. दोन्ही परीक्षेत नापास विद्यार्थ्यांसाठीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना वर्ष वाया न घालविता पुढील वर्गात प्रवेश मिळाला. महाराष्ट्रात दोन्ही परीक्षांच्या उत्तरपत्रिका शिक्षकांनी शाळेतच जाऊन तपासाव्यात असा नियम आहे, पण तो धाब्यावर बसविला जात असल्याचीच चर्चा अधिक आहे. सुटीचा कालावधी असल्यामुळे अनेक शिक्षक घरीच उत्तरपत्रिका तपासण्यासाठी जातात. घरी पेपर तपासणी कोण करते यावर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था नाही. कर्नाटकात उत्तरपत्रिका तपासणी केंद्रात शिक्षकांनी जाऊन निर्धारित वेळेत पेपर तपासणी करणे बंधनकारक असते. त्यामुळे निर्धारित वेळेत निकाल लागतो.गतवर्षी बारावीचा पुरवणी निकाल ३०.६४ टक्के सन २०१४ या शैक्षणिक वर्षात बारावीच्या पुरवणी परीक्षेस बसलेल्या १ लाख ३१ हजार ३९० मुलांपैकी ३५ हजार ९६७ जण उत्तीर्ण झाले. ८७ हजार १४७ मुली परीक्षेला बसल्या होत्या. पैकी ३१ हजार ३०९ मुली उत्तीर्ण झाल्या. दरम्यान, दहावीच्या मुख्य परीक्षेत नापास झालेल्यांपैकी पाच टक्के विद्यार्थी विविध कारणांमुळे पुरवणी परीक्षा देतात. उर्वरित ९५ टक्के मुले परीक्षा देतात. गतवर्षी त्याचा निकाल २५ टक्के लागला होता. शाळानिहाय निकाल दिला जात असल्यामुळे एकत्रित दहावी पुरवणी परीक्षेत किती विद्यार्थी बसले व किती मुले उत्तीर्ण झाले याची सांख्यिकी तपशीलवार आकडेवारी कर्नाटक राज्य माध्यमिक परीक्षेच्या वेबसाईटवर वा कार्यालयात उपलब्ध होऊ शकत नाही, असे संचालक जयकुमार यांनी सांगितले.गतवर्षी बारावीचा पुरवणी निकाल ३०.६४ टक्के सन २०१४ या शैक्षणिक वर्षात बारावीच्या पुरवणी परीक्षेस बसलेल्या १ लाख ३१ हजार ३९० मुलांपैकी ३५ हजार ९६७ जण उत्तीर्ण झाले. ८७ हजार १४७ मुली परीक्षेला बसल्या होत्या. पैकी ३१ हजार ३०९ मुली उत्तीर्ण झाल्या. दरम्यान, दहावीच्या मुख्य परीक्षेत नापास झालेल्यांपैकी पाच टक्के विद्यार्थी विविध कारणांमुळे पुरवणी परीक्षा देतात. उर्वरित ९५ टक्के मुले परीक्षा देतात. गतवर्षी त्याचा निकाल २५ टक्के लागला होता. शाळानिहाय निकाल दिला जात असल्यामुळे एकत्रित दहावी पुरवणी परीक्षेत किती विद्यार्थी बसले व किती मुले उत्तीर्ण झाले याची सांख्यिकी तपशीलवार आकडेवारी कर्नाटक राज्य माध्यमिक परीक्षेच्या वेबसाईटवर वा कार्यालयात उपलब्ध होऊ शकत नाही, असे संचालक जयकुमार यांनी सांगितले.पुरवणी परीक्षा घ्यानापासांचे वर्ष वाचवा२