शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा पध्दती बदलणार

By admin | Updated: May 26, 2016 02:19 IST

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) च्या गोंधळानंतर राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीतही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अभ्यासक्रमात बदल

पुणे : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) च्या गोंधळानंतर राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीतही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अभ्यासक्रमात बदल करणे यंदा शक्य नसल्याने परीक्षा पद्धतीत काही तातडीचे बदल करण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो. याबाबत दहावीच्या निकालानंतर तज्ज्ञांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली.दहावीच्या निकालानंतर मंडळामध्ये तज्ज्ञांची बैठक घेतली जाणार आहे. अकरावी व बारावीच्या सीबीएसई व मंडळाच्या अभ्यासक्रमात फारसा फरक नाही. जवळपास सारखाच अभ्यासक्रम असला तरी सीबीएसईमध्ये अनेक संकल्पना विस्तृतपणे देण्यात आल्या आहेत. एका वर्षात अभ्यासक्रम बदलता येत नाही. सीबीएसईचा अभ्यासक्रम तसेच परीक्षा पद्धतीची माहिती घेऊन त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असेही म्हमाणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दीड हजार निकाल राखीव विविध कारणास्तव १ हजार ५६२ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. त्यात औरंगाबाद विभागात परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी काहींना अटक केली होती. त्यामुळे राज्य मंडळातर्फे औरंगाबाद विभागातील सर्वाधिक ९७३ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत. तसेच पुणे विभागातील ९८, नागपूरमधील ३६२, मुंबईतील ८२,कोल्हापूरमधील १३ आणि लातूर मधील २४ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत. त्याच प्रमाणे कॉपी व अन्य कारणास्तव ७१४ विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करण्यात आले. खेळाडूंना गुणाची सवलतखेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी विशेष गुण देण्यात आले. राज्यातील दोन हजार ५३७ बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध स्तरावर कौशल्य दाखविल्याबद्दल गुणांचा लाभ मिळाला. त्यात पुणे विभागात सर्वाधिक ४५० नागपूर ३०३, औरंगाबाद २१२, मुंबई २९४, कोल्हापूर व अमरावती ३०० नाशिक ३३८ लातूर २९९ तर कोकण विभागातील ३२ विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा फायदा मिळाला.दिव्यांग विद्यार्थ्यांचे लक्षणीय यशबारावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश मिळविले आहे. विविध व्यंग असणाऱ्या या विद्यार्थ्यांचा राज्यभरातील निकाल ८९.६१ टक्के इतका लागला आहे.अंध, बहिरे, मुके, शारीरिक व्यंग असणारे, डायलेक्झिया, मेंदूचा पक्षाघात, आॅटीझमग्रस्त, सेलेब्रल पाल्सी हा आजार असलेले आणि मतिमंद मुलांचा दिव्यांगामध्ये समावेश होतो. राज्यभरातून असे पाच हजार ६११ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातील पाच हजार २८ जणांनी यशस्वीपणे हा टप्पा पार केला आहे.विभागपरीक्षेस बसलेलेपास झालेलेटक्केवारीअंध११७५१०९६९३.२८कर्णबधीर८२४६३०७६.४६मुके१०९८४७७.०६शारीरिक व्यंग२१६४१९५२९०.२०मेंदूचा पक्षाघात८२७५९१.४६डायलेक्झिया१०७३१०२३९५. २६आॅटीझम१३१३१००सेलेब्रल पाल्सी७८७०८९.७४मतिमंद९३८५९१.४०एकूण५६११५०२८८९.६१बारावीची गेल्या पाच वर्षांची निकालाची टक्केवारीवर्षनिकालाची टक्केवारी २०१२७४.४६ २०१३७९.९५२०१४९०.०३२०१५९१.२६२०१६८६.६०