शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री पाचपुते, गावितांची चौकशी

By admin | Updated: April 23, 2015 05:04 IST

आदिवासी खात्यात सन २००४ ते २००९ या काळात झालेल्या विविध योजनांतील भ्रष्टाचार व गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्या. एम. जी. गायकवाड

नाशिक : आदिवासी खात्यात सन २००४ ते २००९ या काळात झालेल्या विविध योजनांतील भ्रष्टाचार व गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्या. एम. जी. गायकवाड आयोगाने तत्कालीन आदिवासीमंत्री बबनराव पाचपुते, डॉ. विजयकुमार गावित, त्यांचे बंधू शरद गावित यांच्यासह आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या असून, त्यावर गुरुवार, दि. २३ रोजी सुनावणी होणार आहे. गुलाबराव तानाजी पगार व मोतीराम बहिरम या दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून आदिवासी विकास विभागाने सन २००४ ते ०९ या काळात राबविलेल्या विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाल्याचे पुरावे सादर केले होते. प्राथमिक चौकशीत तक्रारीत तथ्य आढळून आल्याने मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चौकशी आयोग गठित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने सेवानिवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय आयोग स्थापन केला. मध्यंतरीच्या काळात तक्रारदार पगार व बहिरम या दोघांव्यतिरिक्त आणखी काहीजणांनी तक्रारी दाखल केल्या. त्यात तत्कालीन आदिवासीमंत्री बबनराव पाचपुते, डॉ. विजयकुमार गावित, तत्कालीन आदिवासी विकास महामंडळाचे पदाधिकारी शरद गावित यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले. तक्रारींची शहानिशा करण्याचे काम आयोगाने सुरू केले असून, त्यात गावित बंधू, पाचपुते, त्याचबरोबर तत्कालीन आदिवासी विकास आयुक्त, सचिवांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी आयोगाने नोटिसा बजावल्या. त्यानुसार गावित बंधू यांच्या वतीने औरंगाबादचे अ‍ॅड. प्रवीण पाटील हजर झाले असून, पाचपुते यांच्या बाजूनेही आयोगासमोर बाजू मांडण्यात येऊन ‘आपला काही संबंध नसल्याचा’ पवित्रा घेण्यात आल्याचे समजते. गुरुवारी आयोगाकडून पुढील सुनावणी केली जाणार असून, तक्रारदार पगार व बहिरम यांच्या वतीने अ‍ॅड. विजयेंद्र लोणारी हे बाजू मांडत आहेत. पाचपुते आणि गावित या माजीमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत पाचपुते यांचा पराभव झाला, तर गावित निवडून आले. (प्रतिनिधी)