शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मनपा निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनची जमवाजमव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2017 12:58 IST

४५७० मशीन प्राप्त : उद्या होणार तांत्रिक तपासणी

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एकूण उमेदवारांची संख्या येत्या ७ फेबु्रवारीला माघारीनंतर निश्चित होणार आहे. त्यापूर्वीच, मनपा प्रशासनाने मतदानासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीनची जमवाजमव सुरू केली असून, आतापर्यंत ४५७० बॅलेट युनिट मनपाकडे प्राप्त झाले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी यंदा बहुसदस्यीय प्रभाग पद्धती राबविली जात असून, ३१ प्रभागांसाठी १२२ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. महापालिकेने निवडणुकीसाठी शहरात १४३३ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. प्रत्येक प्रभागात चार सदस्य निवडून द्यायचे असून, प्रत्येक गटासाठी वेगवेगळी मतपत्रिका असणार आहे. त्यासाठी वेगवेगळे बॅलेट युनिट उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. महापालिकेकडे आतापर्यंत १६२९ कंट्रोल युनिट तर ४५७० बॅलेट युनिट प्राप्त झाले आहेत. त्यासाठी १५९५ मेमरी कार्ड प्राप्त झाले आहेत. त्यात अजून २५ मेमरीची गरज भासणार आहे. त्याचीही मागणी नोंदविण्यात आली आहे. सदर ईव्हीएम मशीन अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून आणण्यात आली आहेत. येत्या ७ फेबु्रवारीला अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची संख्या स्पष्ट होईल. त्यानुसार, बॅलेट युनिटची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. गरज भासल्यास आणखी बॅलेट युनिटची मागणी आयोगाकडे नोंदविली जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली. सदर ईव्हीएम मशीनची फर्स्ट लेव्हल चेकिंग येत्या ६ व ७ फेबु्रवारीला मनपाच्या विद्युत विभागामार्फत केली जाणार आहे. त्यानंतर अद्ययावत ईव्हीएम यंत्रे प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्याला वितरित केली जाणार आहे.