शहरं
Join us  
Trending Stories
1
४ टक्के वाढू शकतो कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता; मोदी सरकार देऊ शकते मोठं गिफ्ट
2
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
3
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
4
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
5
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
6
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
7
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
8
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
9
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
10
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
11
कंत्राटे, टेंडर्सच्या मागे लागू नका; मतदारसंघाच्या हिताचा विचार करा, भाजप आमदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला
12
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
13
कार आणि मोटारसायकलच्या टायरमध्ये हवा कमी ठेवण्याचे ४ मोठे नुकसान, अपघाताचाही धोका!
14
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; सेन्सेक्स ७० अंकांनी वधारला, मेटल-ऑटो शेअर्समध्ये घसरण
15
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
16
महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन, चालवली बंगळुरूत; फरारीच्या मालकाला भरावा लागला १.४२ कोटींचा टॅक्स; प्रकरण काय?
17
Post Office च्या PPF स्कीममध्ये महिन्याला ₹२००० जमा कराल तर १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल, पैसेही राहतील सुरक्षित
18
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
19
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
20
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 

अन्य मुलींसोबतही केले अन्सारीने अश्लील चाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2017 06:41 IST

साकीनाक्यात बारा वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणी सादिक अन्सारी (३२) या नराधमाला मंगळवारी

मुंबई : साकीनाक्यात बारा वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणी सादिक अन्सारी (३२) या नराधमाला मंगळवारी अटक करण्यात आली. त्याने या परिसरात अन्य काही मुलींसोबतही व्हाइटनरची नशा देत अश्लील चाळे केल्याचे स्थानिकांचे म्हणणे असून त्यानुसार पोलीस चौकशी करत आहेत. अन्सारी हा त्याच्या बेकरीत खाण्यापिण्याच्या वस्तू घेण्यासाठी येणाऱ्या लहान मुलींशी मैत्री करायचा. त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन बेकरीच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत नेऊन त्यांच्यासोबत अश्लील चाळे करायचा. त्यांना व्हाइटनरची नशा देत तो असा प्रकार करायचा, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. ज्या विद्यार्थिनीने पालकांना अन्सारीबद्दल सांगितले होते, ती काही अन्य मुलींचीदेखील नावे घेत आहे. त्यांच्यावरदेखील अशाच प्रकारे अन्सारीने अत्याचार केल्याचे तिचे म्हणणे आहे. ‘आम्ही अन्सारीवर पॉस्कोअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पीडित मुलीने तिच्या आईला जी काही माहिती दिली त्यानुसार आम्ही अन्सारीविरोधात वैद्यकीय पुरावेदेखील मिळवले. त्यामुळे अन्य मुलींसोबतही जर असा काही प्रकार त्याने केला असेल तर संबंधित मुलीच्या पालकांनी पुढे येऊन याबाबत आमच्याकडे तक्रार करावी. जेणेकरून आम्हाला अन्सारीविरोधात कारवाई करता येईल,’ असे साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले. मात्र अद्याप आमच्याकडे तशी कोणतीही तक्रार आलेली नाही, त्याचबरोबर आम्ही अन्सारीकडेदेखील याबाबत विचारणा करत आहोत, असेही त्यांनी नमूद केले. या प्रकारामुळे साकीनाका परिसरात तणावाचे वातावरण आहे. ( प्रतिनिधी )