शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

‘न्याय मिळवूनही ‘खैरलांजी’त अ‍ॅट्रॉसिटी नसल्याने मूठभरांची टीका’

By admin | Updated: January 15, 2017 00:04 IST

खैरलांजी हत्याकांड प्रकरणात मी प्रामाणिकपणे भूमिका मांडली़ यातील आरोपींना फाशी-जन्मठेपेपर्यंत नेले़ तरीही काही मूठभर लोकांनी मला त्यात अ‍ॅट्रॉसिटीचा अंतर्भाव का

लातूर : खैरलांजी हत्याकांड प्रकरणात मी प्रामाणिकपणे भूमिका मांडली़ यातील आरोपींना फाशी-जन्मठेपेपर्यंत नेले़ तरीही काही मूठभर लोकांनी मला त्यात अ‍ॅट्रॉसिटीचा अंतर्भाव का नाही ? या मुद्यावरुन टीकेचे लक्ष्य केले, अशी खंत विख्यात विधिज्ञ व विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी शनिवारी लातुरात व्यक्त केली़अ‍ॅड. निकम यांच्या हस्ते ३४व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन झाले़ यावेळी ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिका डॉ़ प्रज्ञा दया पवार होत्या़ तर ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे, डॉ़ जनार्दन वाघमारे, रविचंद्र हडसनकर, जि़ प़ चे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, मसापचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रामचंद्र तिरुके, स्वागताध्यक्ष जयप्रकाश दगडे, लेखिका संध्या रंगारी यांची विचारपीठावर प्रमुख उपस्थिती होती़ समाज बदलण्यासाठी देव जन्म घेणार नाही़ उपास-तापासाने परिवर्तन होणारे नाही़; ते साहित्यातूनच घडेल़ समता, बंधुता व न्याय ही बाबासाहेबांनी सांगितलेली मूल्ये ज्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित होतात, तोच खरा साहित्यिक़ अशा साहित्यातील विचार जगता आले पाहिजे. तेव्हाच बाबासाहेबांच्या विचारातील राष्ट्र घडेल, असे अ‍ॅड. निकम म्हणाले. (प्रतिनिधी)अ‍ॅट्रॉसिटीचा विचार व्हायलाच हवा होतासंमेलनाध्यक्ष डॉ़प्रज्ञा दया पवार यांनी अ‍ॅड़ उज्वल निकम यांनी मांडलेले खैरलांजी प्रकरणातील काही मुद्दे आपल्या अध्यक्षीय भाषणात खोडून काढले़ त्या म्हणाल्या, या प्रकरणात अंतर्भूत करता येणाऱ्या काही बाबी झाल्या नाहीत़ दलित अत्याचार विरोधी कायदा तसेच महिलांवरील शारीरिक अत्याचारावर काहीच विचार झाला नाही़ या प्रकरणाचा विचार करता या सर्व सुट्या भागांचा विचार होणे आवश्यक होते़ निकम यांनी यावर सविस्तर बोलायला हवे होते़ अर्थात, त्यांनी कायद्याच्या चौकटीत आपली बाजू प्रामाणिकपणे मांडली असावी़दलित साहित्यामुळे क्रांतीयुगाचा प्रारंभसंत साहित्याने भक्तीयुग तयार केले आहे़ तर दलित साहित्याने क्रांतीयुग तयार केले़ अशा या साहित्याला प्रेरणा देण्याचे कार्य गंगाधर पानतावणे यांनी ‘अस्मितादर्श’च्या माध्यमातून सातत्याने केले आहे, असे माजी खासदार डॉ़जनार्दन वाघमारे म्हणाले.कृष्णा किरवले, संध्या रंगारी पुरस्काराने सन्मानित अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या वतीने संमेलनात लेखकांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरणही झाले़ यंदाचा ज्येष्ठ लेखक पुरस्कार कृष्णा किरवले यांना तर ज्येष्ठ लेखिका पुरस्कार प्राचार्य संध्या रंगारी यांना देण्यात आला.