शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी 'नाम' फांऊडेशनची स्थापना

By admin | Updated: September 16, 2015 11:57 IST

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी 'नाम' फाऊंडेशनची स्थापना केली असून त्याद्वारे एसबीआयच्या बँक अकाऊंटमध्ये थेट मदत जमा करता येणार आहे.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १५ - राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या मदतीसाठी पुढे सरसावलेले संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या मदत अभियानाला राज्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. ही मदत स्वीकारण्यासाठी व त्याचा योग्य विनियोग व्हावा यासाठी 'नाम' फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) नाना पाटेकर यांनी पुण्यातील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात जाऊन या संस्थेची अधिकृत नोंदणी केली असून संस्थेला लगेचच स्टेट बँक ऑफ इंडियाचा अकाऊंट नंबर देण्यात आला आहे.  '35226127148' हा करंट अकाऊंट नंबर असून 'SBIN0006319' हा IFSC कोड आहे तर 'SBINBB238' हा स्विफ्ट कोड ( swift code) आहे. संस्थेच्या नोंदणीनंतर हे क्रमांक मिळाले असून ज्या ज्या व्यक्तींना दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची इच्छा असेल त्यांना आता 'नाम फाउंडेशनच्या' या अकाऊंटमध्ये थेट पैसे जमा करता येतील.
आमच्या या मदत अभियानाला फक्त राज्य वा देशभरातून नव्हे तर परदेशातूनही मोठा प्रतिसाद मिळाला. जिथे जिथे आम्ही जात होतो तेथे लोक आमच्याकडे मदत सुपूर्त करत होते. मात्र त्या सर्व पैशांचा योग्य रितीने विनिमय व्हावा व सर्व गरजूंना ती मदत मिळावी यासाठी ती एका योग्य माध्यमाद्वारे पोचवणे गरजेचे होते. त्यामुळेच आम्ही 'नाम' या फाऊंडेशनची स्थापना केल्याचे नानांनी सांगितले. आता ज्यांना मदत करायची आहे त्यांनी संस्थेच्या याच अकाऊंटमध्ये पैसे जमा करावेत, आमच्या नावाने चालवण्यात येणा-या इतर कोणत्याही संस्था किंवा लोकांकडे पैसे देऊ नका असेही नाना यांनी स्पष्ट केले.  
या माध्यमातून जमा होणारे पैशांपैकी काही पैसे प्रथम आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना देण्यात येतील. त्यात फक्त यावर्षी आत्महत्या केलेले नव्हे तर २०१४ व २०१३ सालच्या शेतक-यांच्या कुटुंबियांचाही समावेश असेल. आमच्या माध्यमातून शेतक-यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी ही आर्थिक मदत म्हणजे केवळ तात्पुरती मलमपट्टी आहे. मात्र हा प्रश्न सोडवण्यासाठी या पैशातून दुष्काळी भागातील तरुणांना कायमस्वरुपी रोजगार देण्याच्या उपाययोजनाही करण्यात येणार आहेत, असेही नाना म्हणाले.