शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘आॅटो हब’ स्थापन करा

By admin | Updated: December 8, 2014 00:59 IST

रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता आॅटोमोबाईल उद्योगामध्ये आहे. एका मोठ्या उद्योगामुळे १०० ते ३०० सहायक युनिटला काम मिळते. विदर्भात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी

विजय दर्डा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : रोजगाराच्या संधीनागपूर : रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता आॅटोमोबाईल उद्योगामध्ये आहे. एका मोठ्या उद्योगामुळे १०० ते ३०० सहायक युनिटला काम मिळते. विदर्भात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने नागपुरात आॅटोमोबाईल हब स्थापन करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खा.विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. खा. दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्य सरकारने नागपुरात आॅटो हब स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी आपण तीन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. यापूर्वीही तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांना पत्र लिहून या मुद्यांकडे त्यांचे लक्ष वेधले होते. मात्र तत्कालीन सरकार आणि मुख्यमंत्री प्रत्युत्तर देण्यावर अपयशी ठरले. शिवाय त्यांनी मला आश्वासन देण्यापलीकडे काहीच केले नाही, असे खा. दर्डा यांनी पत्रात म्हटले आहे. दर्डा यांनी म्हटले आहे की, सहायक युनिट नसल्याने आॅटो क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांनी विदर्भात गुंतवणूक करण्यास नकार दिला. पण महिन्द्र अ‍ॅण्ड महिन्द्र ट्रॅक्टर प्रकल्प यास अपवाद ठरला. हा प्रकल्प सहायक युनिटविना हिंगणा एमआयडीसी परिसरात यशस्वीरीत्या सुरू आहे. दरदिवशी पाच ट्रॅक्टर उत्पादनाच्या क्षमतेने सुरू झालेल्या या प्रकल्पात सध्या दरदिवसाला २५० ट्रॅक्टरचे उत्पादन करण्यात येत असल्याचे दर्डा यांनी पत्रात नमूद केले आहे. राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे महाराष्ट्रातील अनेक आॅटोमोबाईल कंपन्यांनीतत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याशिवाय ३० ते ४० आॅटोमोबाईल उद्योजकांना (दुचाकी आणि तीनचाकी) आपला विस्तारीकरण प्रकल्प विदर्भात सुरू करण्याची विनंती केली होती. त्यापैकी बहुतांश जणांनी आॅटो हब स्थापनेसाठी होकार दिला आहे. लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा (बाबूजी) उद्योगमंत्री असताना त्यांनीसुद्धा विदर्भात आॅटो उद्योग सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. त्याचाच परिणाम म्हणून अशोक लेलँडने ट्रक उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. पण कंपनीने भंडारा जिल्ह्यातील वरठी येथे केवळ स्टॉक यार्ड सुरू केल्याचा उल्लेख खा. दर्डा यांनी पत्रात केला आहे.