शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

गल्लीबोळात दिसू लागलीय 'आर्चीची बुलेट' !

By admin | Updated: May 13, 2016 22:38 IST

गावागावात बाईकवरून फिरणारी आधुनिक आर्ची अनेकांच्या नजरेस पडू लागलीय

ऑनलाइन लोकमतसातारा, दि. 13- अवघ्या हिंदी सिनेसृष्टीपासून मराठी चित्रपटसृष्टीला वेड लावणा-या सैराटचा प्रभाव आता गावागावात पोहोचू लागला आहे. गावागावात सायकलऐवजी तरुणींचा बाईक शिकण्याकडे कल वाढू लागला आहे. आज थेट गावागावात बाईकवरून फिरणारी आधुनिक आर्ची अनेकांच्या नजरेस पडू लागलीय. गेल्या एक महिन्यापासून सातारा जिल्ह्यातील गावागावात मोटारसायकल चालविणा-या तरुणींच्या संख्येत कैकपटीने वाढ झाल्याची आश्चर्यकारक अन् धक्कादायक आकडेवारी लोकमतनं केलेल्या सर्वेक्षणात उघड झालीय. विशेष म्हणजे, ही सारी किमया सैराटचीच, अशी चक्क कबुलीही अनेक मुलींच्या पालकांनी मोठ्या कौतुकानं दिलीय.शिक्षणासाठी रोज तालुक्याच्या गावाला जाणा-या तरुणींची संख्या जिल्ह्यात लाखोंमध्ये असली तरी स्वत:च्या गाडीवर कॉलेजला जाणा-या मुली तशा कमीच. ज्या गाडी चालवितात, त्यांच्या हातीही केवळ सायकल, स्कूटर किंवा मोपेडच असायची. मात्र दोन आठवड्यांपूर्वी नागनाथ मंजुळेंचा सैराट हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रच पालटलं. सैराटमधली बुलेट चालविणारी आर्ची पाहून साता-यात शेकडो तरुणी बाईक घेऊन रस्त्यावर दिसतायत. ज्या मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये दर महिन्याला सरासरी 10 ते 15 तरुणी मोपेड शिकायच्या, तिथंच गेल्या पंधरा दिवसांत 50पेक्षाही जास्त मुलींनी बाईकचं ट्रेनिंग घेतलंय. कौतुकाची गोष्ट म्हणजे, मुलींच्या या नव्या छंदाला त्यांच्या पालकांनीही मनापासून पाठिंबा दिलाय. विशेष म्हणजे बाईक चालविणा-या मुलींना जिन्स पॅन्ट घालून बाईकवर बसायला मस्त वाटतं. काही मुलींनी बाईक चालविण्यामुळं उलट आत्मविश्वास वाढल्याचंही म्हटलं आहे. बाईक मुलीही चालवू शकतात, हे आर्चीनं जगाला दाखवून दिल्याचं अनेक मुली म्हणाल्यात.

बाईक चालवण्याकडे मुलींचा वाढता कलगेल्या पंधरा दिवसांत शंभरपेक्षाही जास्त तरुणींनी आमच्याकडे बाईक शिकण्याबाबत चौकशी केली. अनेक जणींनी शिकायलाही सुरुवात केली. आजपर्यंत केवळ स्कूटर शिकायला येणारा साता-यातील महिला वर्ग आता बाईककडे वळतोय, हे पाहून खूप बरं वाटलं. पुढच्या सहा महिन्यांत बाईक चालविणा-या मुलींची संख्या रस्त्यावर नक्कीच वाढलेली असेल.- श्रुती कुलकर्णी, वाहन प्रशिक्षक, सातारा.