शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

सर्व पतसंस्थांच्या व्याजदरात समानता

By admin | Updated: January 4, 2017 02:48 IST

राज्यातील १५ हजार ४७० सहकारी पतसंस्थांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पतसंस्था नियामक मंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत

मुंबई : राज्यातील १५ हजार ४७० सहकारी पतसंस्थांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पतसंस्था नियामक मंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे पतसंस्थांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे. तथापि, पतसंस्थांच्या फेडरेशनने या निर्णयास विरोध दर्शविला आहे. पतसंस्था स्वीकारत असलेल्या ठेवींवरील व्याजाचे दर आणि त्या देत असलेल्या कर्जावरील व्याजदरामध्ये समानता आणली जाणार आहे. त्यामुळे पतसंस्थांना यापुढे मनमानी व्याजदर देता येणार नाही. हे दर ठरविण्याचा अधिकार आता नियमाक मंडळाला असेल. महाराष्ट्र सहकारी पतसंस्था अधिनियम १९६० मध्ये अनेक प्रकारचे बदल करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. पतसंस्थांचे संचालक आणि त्यांचे नातेवाइक यांनी कर्जाच्या प्रमाणामध्ये तारण ठेवल्याशिवाय त्यांना कर्ज देणे बेकायदेशीर ठरविण्यात आले आहे. आतापर्यंत नियमामध्ये सुस्पष्टता नसल्याचा फायदा घेऊन तारणाशिवाय कर्ज देण्याचे प्रकार अनेकदा घडले होते. पतसंस्था अचानक बंद पडली तर त्यातील ठेवीदारांचे पैसा बुडतो. यापुढे प्रत्येक पतसंस्थेला विशिष्ट रक्कम स्थिरता निधी म्हणून बाजूला ठेवावा लागेल. पतसंस्था बंद पडली तर या स्थिरता निधीतून ठेवीदारांना रक्कम दिली जाईल. अर्थात, कोणत्या संस्थेने किती स्थिरता निधी ठेवावा, संबंधित पतसंस्थेने नियमांचे पालन केले होते की नाही याची खातरजमा नियामक मंडळ करेल. पतसंस्थांनी करावयाचे कर्जवाटप आणि त्यांनी ठेवायचा तरलता निधी याबाबत नियामक मंडळ प्रमाण निश्चित करेल. प्रत्येक पतसंस्थेला त्यांच्याकडील रकमेच्या किमान ६० टक्के रक्कम ही कर्ज म्हणून वाटप करावी लागणार आहे. प्रत्येक पतसंस्थेला तिच्या वित्तीय स्थितीची माहिती दर तीन महिन्यांनी नियामक मंडळास द्यावी लागेल. (विशेष प्रतिनिधी) दिलासा देण्याऐवजी आज बंधने घातली- नोटाबंदीच्या निर्णयाचा मोठा फटका आज पतसंस्थांना बसलेला असताना राज्य सरकारने पतसंस्थांना काही सवलतींचा दिलासा देण्याऐवजी आज बंधने घातली आहेत. पतसंस्थांनी दिलेल्या कर्जाची वसुली व्हावी यासाठी कडक कायदे सरकारने करणे अपेक्षित होते. तसेही झालेले नाही. त्यामुळे आजच्या निर्णयाचे स्वागत करण्याचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली.