शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

इफेड्रीन : दोन अंगडिया चालकांची चौकशी

By admin | Updated: July 27, 2016 20:18 IST

अडीच हजार कोटींच्या बेकायदेशीर इफे ड्रीनच्या साठ्याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने दोन अंगडिया चालकांचीही चौकशी सुरू केली आहे.

जितेंद्र कालेकर

ठाणे : अडीच हजार कोटींच्या बेकायदेशीर इफेड्रीनच्या साठ्याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने दोन अंगडिया चालकांचीही चौकशी सुरू केली आहे. तसेच याप्रकरणी प्रथम माहिती अहवालात (एफआयआर) नार्कोटिक्स अ‍ॅक्टच्या कलम २८ चाही समावेश केल्याची माहिती सूत्रांनी दिली. इफे ड्रीनची देशविदेशांत तस्करी केल्यानंतर त्या व्यवहाराच्या पैशांची बँकेत अधिकृत नोंद होऊ नये तसेच आयकर विभागाचीही नजर जाऊ नये, यासाठी एव्हॉन लाइफ सायन्सेसचा तत्कालीन संचालक मनोज जैन, सल्लागार पुनीत श्रींगी यांनी योग्य प्रकारे ‘खबरदारी’ घेतल्याचे तपासात उघड होत आहे. यातील सूत्रधार जयमुखी याने इफे ड्रीनची तस्करी करण्यासाठी किशोरसिंग राठोड आणि जैन यांच्यात मध्यस्थाची भूमिका केली. ड्रग तस्करीचे पैसे हवालामार्फत विकी गोस्वामी आणि ममता कुलकर्णी यांना दिले गेले.

ते भुलेश्वर, मालाड आणि गुजरात येथून त्यांना पाठवल्याचेही काही दुवे पोलिसांच्या हाती लागले आहेत. याप्रकरणी दोन अंगडिया चालकांची पोलिसांनी मंगळवारी आणि बुधवारी चौकशी केली. या चौकशीत फारसे काही हाती लागले नाही. मात्र, त्यांच्या व्यवहारांची माहिती देण्याबाबत ठाणे पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याने कोणतीही माहिती आताच उघड करणे उचित होणार नसल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, अमली पदार्थ बनवण्याची पूर्वतयारी केल्याबाबतचे एनडीपीएस अ‍ॅक्टमधील कलम २८ चा समावेशही सुरुवातीच्या एफआयआरमध्ये केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.