शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी बचतीसाठी उद्योजक सरसावले

By admin | Updated: May 19, 2016 06:06 IST

‘लोकमत’ने सुरू केलेल्या जलमित्र अभियानाला राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून

मुंबई : राज्यातील भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सुरू केलेल्या जलमित्र अभियानाला राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे पाणी बचतीची मोहीम सुरू झाली आहे. जळगाव येथील उद्योजकांनीदेखील या अभियानात पुढाकार घेऊन पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत साठवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जळगावमध्ये या मोहिमेत सहभागी होण्यासाठी उद्योजकांनी घेतलेल्या बैठकीत त्यांच्या कंपनीत पाणी बचतीसाठी शक्य तेवढा पाण्याचा कमी वापर केला जाईल. पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी जलपुनर्भरण यंत्रणा उभारू, पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कामगारांमध्ये प्रबोधन करू, अशी ग्वाही याप्रसंगी दिली.या बैठकीस जिंदा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रजनीकांत कोठारी, जिंदा संघटनेचे अध्यक्ष भुवनेश्वर सिंग, लघु उद्योग भारतीचे अंजनीकुमार मुंदडा, लघु उद्योग भारतीचे जिल्हाध्यक्ष संजयकुमार तापडिया, एम़ सेक्टरचे संचालक अरुण बोरोले, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे माजी अध्यक्ष चंद्रकांत बेंडाळे उपस्थित होते.कोल्हापूर येथील मंगेशकर नगरातील सांगलीकर कुटुंबीयांनी हात धुतलेले तसेच भांडी धुण्यासाठी वापरलेले अनेकांच्या घरातील पाणी थेट गटारीमध्ये जाऊ न देता आपल्या बंगल्याच्या परिसरातील विविध झाडे जगविण्यासाठी वापरले आहे. या पाणी बचतीच्या प्रयत्नांबाबत गौरव सांगलीकर यांनी सांगितले की, मंगेशकरनगरमधील आमच्या बंगल्यात आई-वडिलांसह मी राहतो. बंगल्याच्या आवारात विविध फळे व फुलांची झाडे आम्ही लावली आहेत. सध्याच्या दुष्काळी स्थितीत पाण्याची उपलब्धता कमी आहे. अशा स्थितीत झाडांना पाणी देण्यासाठी अन्य ठिकाणांहून पाणी उपलब्ध करणे अथवा खरेदी करण्याऐवजी आपल्याजवळ असलेल्या पाण्याचा योग्य पद्धतीने कसा वापर करता येईल, याचा विचार आम्ही केला़ त्यानुसार वॉश बेसिनच्या नळाखाली मोठे भांडे ठेवले. त्यात हात आणि भांडी धुतल्यानंतरचे पाणी आम्ही वाचविले. हे पाणी बंगल्याच्या परिसरातील झाडांना दररोज दिले जाते. त्यासह वॉटर प्युरिफायरमधून बाहेर पडणारे अतिरिक्त स्वरूपातील पाणी थेट परसातील झाडांना दिले जात आहे. राज्याच्या बहुसंख्य भागात पाणीटंचाई आहे. नागपुरात अशी परिस्थिती नसली तरी भविष्याचा विचार करता पाण्याचा अपव्यय होणार नाही, यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी म्हणून जनजागृतीचा प्रयत्न आहे. जलसंवर्धनासाठी शासनाने विविध उपक्रम सुरू केले आहेत. नागपूर शहरातील नागरिकांनीही बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्ंिटंग यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. यासाठी जनजागृतीचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. पाण्याचा अपव्यय टाळून बचत केली तर भविष्यात पाणी संकटावर मात करता येईल. जलपुनर्भरणासाठी शासन व महापालिकेच्या योजना आहेत. याचा नागरिकांनी उपयोग करून घेण्याची गरज आहे. -कृष्णा खोपडे, आमदार, नागपूर पूर्व