शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांना थेट शेतकऱ्यांकडून जमीन खरेदीची मुभा; विधेयकाला मंजुरी

By admin | Updated: December 18, 2015 02:37 IST

राज्य सरकारने भूसंपादनाच्या प्रक्रियेत स्वत:ला पहारेदाराच्या भूमिकेपर्यंत मर्यादित केले आहे. राज्यातील उद्योजक उद्योगांसाठी आता थेट शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी

नागपूर : राज्य सरकारने भूसंपादनाच्या प्रक्रियेत स्वत:ला पहारेदाराच्या भूमिकेपर्यंत मर्यादित केले आहे. राज्यातील उद्योजक उद्योगांसाठी आता थेट शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करू शकतील. खरेदी केलेल्या जमिनीवर दहा वर्षांच्या आत उद्योग उभारावे लागतील. तसे न केल्यास दहा वर्षांपूर्वीच्या खरेदी किमतीवर शेतकऱ्यांना जमीन परत द्यावी लागेल. यासंबंधीचे सुधारणा विधेयक गुरुवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले.महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी यासंबंधीचे विधेयक सादर केले होते. ज्यावर विधानसभेत सर्वंकष चर्चा झाली. यावर उत्तर देताना खडसे म्हणाले, पूर्वी शेती खरेदी करण्यासाठी शेतकरी असणे आवश्यक होते; सोबतच संपादित केलेल्या जमिनीवर उद्योग न उभारल्यास ती परत घेण्यासाठी मुदत निश्चित नव्हती. या विधेयकात ही तरतूद करण्यात आली. त्यामुळे आता शेतकरी नसलेली व्यक्ती, उद्योजकही शेतजमीन खरेदी करू शकेल. पूर्वी १० हेक्टरपेक्षा जास्त जमीन खरेदी करून उद्योग उभारण्यासाठी उद्योग विभागाच्या विकास आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागत होती. नव्या विधेयकानुसार अशी तरतूद करण्यात आली आहे की विकास आयुक्तांची परवानगी न घेताही उद्योगांसाठी शेतजमीन खरेदी करता येईल. शेतकरी व उद्योजक यांच्यात थेट बोलणी होऊन जमिनीचे व्यवहार होतील. मात्र, शहरी भागात रेडीरेकनरच्या अडीचपट व ग्रामीण भागात पाचपटीहून अधिक दरावरच शेतजमीन उद्योगांना मिळेल. पूर्वी उद्योग उभारण्यासाठी १५ वर्षांची मुदत होती. आता ती कमी करून १० वर्षे करण्यात आली आहे. पहिल्या पाच वर्षात उद्योग उभारण्यात आला नाही तर उद्योजकाला रेडीरेकनरच्या मूल्याच्या आधारावर प्रति वर्ष दोन टक्के दराने दंड भरून पुढील पाच वर्षांची मुदत वाढवून घ्यावी लागेल. दहा वर्षातही उद्योग उभारण्यात आला नाही तर जिल्हाधिकारी संबंधित जमीन परत घेण्याची कार्यवाही करतील.