शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

प्रवेशपत्राअभावी परीक्षेला मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2016 02:17 IST

विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात (टीवायबीएस्सी) शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले आहे

मुंबई : गिरगाव चौपाटी येथील भवन्स महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात (टीवायबीएस्सी) शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले आहे. महाविद्यालय प्रशासनाने प्रवेशपत्र (हॉलतिकीट) दिले नाही, म्हणून परीक्षेला मुकावे लागल्याचा आरोप संबंधित विद्यार्थ्यांनी केला आहे.अन्य विद्यार्थ्यांनाही हॉलतिकीट मिळविण्यासाठी कसरत करावी लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांच्या तृतीय वर्ष बीएस्सीच्या परीक्षा मंगळवारी सुरू झाल्या. मात्र भवन्स महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसता आले नाही, म्हणून थेट गावदेवी पोलीस ठाणे गाठले. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. काही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक तास आधीच हॉलतिकीट मिळाल्याचा आरोपही संबंधित विद्यार्थ्यांनी केला आहे.यासंदर्भात महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे सादर करण्यात आलेली नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचे पीएनआर क्रमांक आले नाही. ही महाविद्यालयाची चूक असून मंगळवारी झालेला पेपर पुन्हा घेण्यात येणार नाही, अशी प्रतिक्रिया विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनी दिली. तर महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला असता, अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.