शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा दलाच्या आधुनिकीकरणावर भर

By admin | Updated: March 2, 2015 02:32 IST

पालिका सुरक्षा खात्यात दोन वर्षांच्या काळात अनेक बदल झाले असून, मागील वर्षी पार पडलेल्या भरतीत १ हजार जणांना काम

मुंबई : पालिका सुरक्षा खात्यात दोन वर्षांच्या काळात अनेक बदल झाले असून, मागील वर्षी पार पडलेल्या भरतीत १ हजार जणांना काम करण्याची संधी मिळाली आहे. खात्यातील साहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्यांची, ४०० सुरक्षारक्षकांची पदे रिक्त असून, ती लवकरच भरली जातील. अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमरे, स्कॅनर मशिन, वाहनांना अडथळा ठरणारी यंत्रे विकत घेऊन सुरक्षा दलाचे आधुनिकीकरण करण्यात येईल, असे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त शांताराम शिंदे यांनी सांगितले.महापालिका सुरक्षा दलाचा ४९वा वर्धापन दिन भांडुप संकुल येथील सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणात रविवारी पार पडला; त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात शांताराम शिंदे बोलत होते. प्रमुख सुरक्षा अधिकारी अरुण वीर म्हणाले, की १९६६ साली स्थापन झालेल्या पालिका सुरक्षा दलाची कार्यकक्षा वाढत चालली असून, या खात्यात १०० अधिकारी, ४ हजार जवान कार्यरत आहेत. मुंबई आणि नगरबाह्य विभागातील महापालिका मालमत्तांचे संरक्षण करण्यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत हे दल २४ तास कार्यरत राहत आहे. विभागात रिक्त असलेले सुरक्षा अधिकारी व सुरक्षारक्षकांची पदे भरण्यासाठी भरतीचा प्रस्ताव सादर करणार येणार आहे.प्रारंभी पालिका सुरक्षा दलाने शिस्तबद्धरीत्या संचलन सादर करून मानवंदना दिली. त्यानंतर पंजाबी नृत्य, सामूहिक वंदे मातरम् तसेच कराटेची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. शिवाय विविध क्रीडा प्रकारांत अंतिम विजेत्या ठरलेल्या संघांचा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये कबड्डी स्पर्धेत मोहन पाडावे, व्हॉलीबॉल स्पर्धेत कर्णधार नितीन कांबळे, क्रिकेट स्पर्धेत मनोज काटुले यांचा उपायुक्त शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.या वर्षी उत्कृष्ट संचलनासाठीचा चषक शहर विभागाच्या पथक क्रमांक ९ने पटकावला असून, त्याचे नेतृत्व साहाय्यक सुरक्षा अधिकारी शेखर उदराज यांनी केले. याप्रसंगी या वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांचा या वेळी पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्रमुख सुरक्षा अधिकारी अरुण वीर, उप प्रमुख सुरक्षा अधिकारी विजय डाळींबकर, उप प्रमुख सुरक्षा अधिकारी श्रीनिवास कुळकर्णी, विभागीय सुरक्षा अधिकारी शिरीष काळे, विजय पराशर, साहाय्यक सुरक्षा अधिकारी तानाजी बांगर, रामचंद्र हराळे यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)