शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनाही ‘काम’ देणार

By admin | Updated: April 2, 2017 03:02 IST

तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनात त्या ज्ञानाचा वापर करता येत नाही. यावर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांप्रमाणे

पुणे : तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनात त्या ज्ञानाचा वापर करता येत नाही. यावर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनाही ग्रामीण भागात जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकासविषयक कामे देण्याबाबत विचार सुरू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.मनुष्यबळ विकास मंत्रालयासह विविध संस्थांच्या सहकार्याने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने आयोजित केलेल्या ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’मध्ये पुण्यासह देशभरातील २६ केंद्रांतील सुमारे १० हजार विद्यार्थ्यांशी पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्ली येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. पुण्यात कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या आवारात या स्पर्धेचे केंद्र आहे. या ठिकाणी मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते. या संवादादरम्यान एका विद्यार्थिनीने वैद्यकीय विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात जाऊन काम करणे बंधनकारक असून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनाही अशी संधी मिळाल्यास ग्रामीण भागाचा विकास होईल, असे मोदी यांना सुचविले. यावर मोदी यांनी गुजरातमध्ये असा प्रयोग यापूर्वीच केला असल्याचे सांगितले. तिथे सुटीच्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विविध समस्या सोडविण्याची कामे त्यांना देण्यात आली होती. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. केंद्र स्तरावरही हा विचार सुरू आहे, असे मोदी यांनी या वेळी स्पष्ट केले. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोदी म्हणाले, ‘‘तंत्रज्ञानाचा झपाट्याने वापर वाढत असून आपले जीवनमानही त्यानुसार बदलत आहे. दैनंदिन जीवनातील लोकांच्या गरजा भागविणे, जीवनमान उंचावणे तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. सर्व समस्या सरकारच सोडवेल, हा भ्रम असून लोकसहभागाशिवाय ते शक्य होणार नाही. यामध्ये तरुणांचा सहभाग महत्त्वाचा आहे.’’ आजच्या तरुणाईमध्ये खूप क्षमता असून, नवनवीन कल्पनांचा ध्यास ती घेते. या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी संकल्प करून त्यासाठी अपार कष्ट करायला हवेत. त्यामध्ये गुणवत्तेशी तडजोड करता कामा नये, असा सल्ला मोदी यांनी दिला. दरम्यान, हॅकेथॉनमध्ये देशातील विविध अभियांत्रिकी, आयआयटी, एनआयटी तसेच इतर संशोधन संस्थांमधील १,२६६ संघांमध्ये १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. दि. १ व २ एप्रिल असे दोन दिवस देशातील २६ शहरांमध्ये एकाच वेळी हॅकेथॉनची अंतिम फेरी होत आहे. राज्यात पुण्यासह मुंबई आणि नागपूर या केंद्रांचा त्यामध्ये समावेश आहे. एकूण २९ मंत्रालये व विभागांशी संबंधित विविध समस्या, अडचणींवर उपाययोजना शोधण्यासाठी या अभिनव हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. चांगल्या उपाययोजना, कल्पना सुचविणाऱ्या संघांना पारितोषिके दिली जाणार आहेत. दि. २ एप्रिल रोजी रात्री या स्पर्धेचे निकाल जाहीर केले जातील. (प्रतिनिधी)