शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया आजपासून

By admin | Updated: June 2, 2016 00:45 IST

राज्यातील अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया गुरुवारपासून सुरू होणार आहे. याबाबतचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) बुधवारी जाहीर केले.

पुणे : राज्यातील अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया गुरुवारपासून सुरू होणार आहे. याबाबतचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) बुधवारी जाहीर केले. ही प्रक्रिया दि. १ आॅगस्टपर्यंत चालणार असून दि. १ आॅगस्ट रोजी शैक्षणिक कामकाजाला सुरुवात होईल. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्यात ठिकठिकाणी सुविधा केंद्रेही सुरू करण्यात आली आहेत. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यानंतर डीटीईमार्फत अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. राज्यातील शासकीय, शासकीय अनुदानित, विद्यापीठातील विभाग, आयसीटी मुंबई आणि खासगी विनाअनुदानित संस्थांमधील सुमारे १ लाख ५४ हजार जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया होणार आहे. ‘डीटीई’ प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया २ जूनपासून सुरू होईल. विद्यार्थ्यांना डीटीईच्या संकेतस्थळावरून प्रवेशाची आॅनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रकदि. २ ते १६ जून : आॅनलाइन अर्ज नोंदणीदि. २ ते १७ जून : सुविधा केंद्रांवर कागदपत्रांची पडताळणी आणि अर्जनिश्चितीदि. १९ जून : तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध दि. १९ ते २१ जून : सुविधा केंद्रांवर हरकती नोंदविणेदि. २२ जून : अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे, पहिल्या ‘कॅप’ फेरीसाठी प्रवर्गनिहाय जागांचे वितरण प्रसिद्ध होणारदि. २२ जून ते २५ जून : कॅप १, २, ३ साठी पसंतीक्रम भरणेदि. २७ जून : कॅप एकसाठी तात्पुरती प्रवेश यादीदि. २८ जून ते ५ जुलै : अ‍ॅडमिशन रिपोर्टिंग सेंटर (एआरसी)वर जाऊन मूळ कागदपत्रे सादर करणे. फ्रीज, स्लाईड किंवा फ्लोटचा पर्याय निवडणेदि. ७ जुलै : कॅप दोनसाठी तात्पुरती प्रवेश यादी प्रसिद्धदि. ८ ते १२ जुलै : एआरसीवर जाऊन मूळ कागदपत्रे सादर करणे व पर्याय निवडणेदि. १४ जुलै : कॅप तीनसाठी तात्पुरती प्रवेश यादी प्रसिद्धदि. १५ ते १८ जुलै : एआरसीवर जाऊन मूळ कागदपत्रे सादर करणे व पर्याय निवडणेदि. २० जुलै : कॅप चारसाठी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करणेदि. २१ ते २४ जुलै : कॅप चारसाठी पसंतीक्रम भरणे दि. २६ जुलै : कॅप चारसाठी तात्पुरती प्रवेश यादी प्रसिद्ध करणेदि. २७ ते २९ जुलै : एआरसीवर जाऊन मूळ कागदपत्रे सादर करणेदि. २८ जुलै ते ६ आॅगस्ट : सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश यादीनुसार संबंधित संस्थेत जाऊन प्रवेश निश्चित करणे