शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

अभियांत्रिकी कॉलेज होणार ‘हाऊसफुल्ल’

By admin | Updated: June 9, 2016 06:07 IST

गेल्या काही वर्षांपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची ‘क्रेझ’ संपली असे चित्र दिसून येत होते.

मुंबई /नागपूर : गेल्या काही वर्षांपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची ‘क्रेझ’ संपली असे चित्र दिसून येत होते. यंदा मात्र अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसून येत आहे. ‘एमएचटी-सीईटी’मध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी पात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. तर, दुसरीकडे गेल्या तीन वर्षांत पॉलिटेक्निकच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी पाठ फिरवताना दिसत आहेत. त्यामुळे रिक्त जागांचा आकडा तिपटीने फुगल्याची माहिती आहे.अभियांत्रिकीमधील रिक्त जागा हे महाविद्यालयांसाठी चिंतेचे कारण झाले होते. परंतु यंदा मात्र स्थिती बदललेली दिसून येत आहे.अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘सीईटी’मध्ये पात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. उपलब्ध जागांपेक्षा कितीतरी अधिक संख्येने विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. यातील काही विद्यार्थी दुसऱ्या राज्यात प्रवेश घेतील. परंतु तरीदेखील उपलब्ध जागांपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेशेच्छुक राहणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयांच्या प्रवेशाचा ‘कोटा’ पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.गेल्यावर्षी राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील ६४ हजारहून अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा राज्यभरात अभियांत्रिकीच्या १ लाख ३८ हजार ७४१ जागा आहेत. ‘सीईटी’च्या माध्यमातून प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या द्यिार्थ्यांची संख्या २ लाख ६२ हजार इतकी आहे. त्यामुळे निश्चितच महाविद्यालयांमधील प्रवेशसंख्या वाढीस लागणार आहे. गेल्यावर्षी पॉलिटेक्निकच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या ८३ हजार ७८५ जागा रिक्त होत्या, त्यापैकी एक हजाराहून अधिक जागा या अनुदानित महाविद्यालयांतील आहेत. तर यंदा तब्बल ८ हजार १४२ जागा घटल्याचे प्रशासनाने सांगितले. विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही, अभ्यासक्रम बंद पडला आणि विविध कारणांमुळे या जागा कमी झाल्याचे प्रशासनाने सांगितले. (प्रतिनिधी) >पॉलिटेक्निकची आकडेवारी2013-14 साली अभियांत्रिकी पदविकेच्या २७ हजार ०९२ जागा रिक्त होत्या. तर २०१४-१५ साली रिक्त जागांची संख्या ७७ हजार २४७ वर पोहचला आहे. याउलट गेल्यावर्षी हाच आकडा ८३ हजार ७८५ इतका होता.