शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

तीन प्रभाग समितींत अखेर कमळ फुलले

By admin | Updated: April 30, 2016 03:11 IST

पालिकेच्या सहा प्रभाग समिती सभापतीपदासाठी शुक्रवारी झाली. त्यात प्रभाग समिती क्रमांक २, ४ व ६ मध्ये कमळ फुलले तर तीनमध्ये ठरल्याप्रमाणे शिवसेना विजयी झाली.

भार्इंदर : पालिकेच्या सहा प्रभाग समिती सभापतीपदासाठी शुक्रवारी झाली. त्यात प्रभाग समिती क्रमांक २, ४ व ६ मध्ये कमळ फुलले तर तीनमध्ये ठरल्याप्रमाणे शिवसेना विजयी झाली. प्रभाग एकमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकला. प्रभाग समिती एकसाठी राष्ट्रवादीचे आसिफ शेख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. समिती दोनमध्ये राष्ट्रवादीचे सुरेश खंडेलवाल व भाजपाचे डॉ. रमेश जैन यांनी उमेदवारी दाखल केल्याने त्यात डॉ. जैन यांची बहुमताने निवड झाली. समिती तीनचे सभापतीपद यंदाही शिवसेनेला देण्याची तडजोड भाजपा-सेनमध्ये झाल्याने सेनेच्या उमेदवार नीलम ढवण विजयी झाल्या. परंतु, ऐनवेळी हे पद भाजपाला देण्यावर तडजोड झाली. भाजपाने तसा पक्षादेश काढून पक्षाचे उमेदवार यशवंत कांगणे यांना मतदान करण्याचे निर्देश दिले. परंतु, निवडणुकीच्या काही तासअगोदर २०१४ प्रमाणेच जागा वाटप करण्याचे ठरविण्यात आले. त्याची कल्पना कांगणे यांना न दिल्याने त्यांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे सेनेच्या उमेदवार ढवण यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, गटनेता शरद पाटील, माजी सभापती राकेश शहा यांची कांगणे यांना फोनाफोनी सुरु झाली. त्यालाही कांगणे यांनी प्रतिसाद न दिल्याने अखेर आमदार नरेंद्र मेहता यांनी कांगणे यांना उमेदवारी मागे घेण्याचे आदेश दिल्याने ढवण यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. कांगणे यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर सभागृहातून निघून गेल्या. ढवण यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. (प्रतिनिधी)