शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात जालन्याच्या दाम्पत्यासह अर्भकाचाही अंत

By admin | Updated: November 23, 2015 01:39 IST

नागपूर-पूणे या महामार्गावर किनगावराजानजिक अपघात; महिलेचा घटनास्थळीच गर्भपात.

सिंदखेडराजा (बुलडाणा): भरधाव ट्रकने मोटारसायकलला जबर धडक दिल्याने जालना जिल्ह्यातील एका दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर-पूणे या महामार्गावरील किनगावराजानजिक रविवारी सकाळी घडली. अपघात एवढा भीषण होता की, महिलेचा घटनास्थळीच गर्भपात होऊन तिच्या आठ महिन्यांच्या अर्भकाचाही करूण अंत झाला.जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथील विकास आणि अश्‍विनी शिंदे अशी मृतांची नावे आहेत. अश्‍विनी ही सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथील संजय देवराव खरात यांची मुलगी होती. भोकदरन तालुक्यातील लोणगाव येथील विकास शिंदे यांच्याशी काही वर्षापूर्वी तिचे झाले होते. ती ८ महिन्यांची गर्भवती होती. भाऊबिजनिमित्त एकूलत्या एक भावाला ओवाळण्यासाठी अश्‍विनी जांभोरा येथे माहेरी आलेली होती. दिवाळी आटोपून २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजता विकास आणि अश्‍विनी एमएच २८ एम ३३0९ क्रमांकाच्या मोटारसायकलने जांभोरा येथून लोणगावसाठी निघाले होते. गावापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या किनगावराजानजिक केए 0८-३९0६ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जबर धडक दिली. या अपघातात विकासच्या मेंदुला जबर मार लागला. त्यांचा आणि पत्नी अश्‍विनी हिचादेखील घटनास्थळीच मृत्यू झाला. दोघांच्या रक्तामांसाचा सडा तिथे पडला होता. अपघातामुळे अश्‍विनीचा आठ महिन्यांचा गर्भ पोटातून बाहेर पडून त्याचाही मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी शेकडो लोक जमा झाले. एका वाहन चालकाने ट्रकचा पाठलाग करुन चालकास पोलिसांच्या ताब्यात दिले. *अपघाताने दिला मृत्यूला जन्मया अपघातात आठ महिन्यांची गर्भवती अश्‍विनी हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताचा धक्का एवढा जबर होता की, तिच्या गर्भातील ८ महिन्यांचे अर्भक बाहेर पडले. अवघ्या महिनाभरात जी माता बाळाला जन्म देणार होती, त्या मातेला दूर्दैवाने मृत्यूलाच जन्म द्यावा लागला. सोशल मिडियावर या अपघाताची छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर अनेकांची मने हेलावून गेली.