शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणीचे समर्थन करणाऱ्यांनी बोलू नये

By admin | Updated: February 20, 2017 01:37 IST

देशावर लादलेल्या आणीबाणीचे ज्या शिवसेनेने समर्थन केले, त्या पक्षाच्या नेत्यांना आणीबाणीवर बोलण्याचा अधिकारच नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

ठाणे : देशावर लादलेल्या आणीबाणीचे ज्या शिवसेनेने समर्थन केले, त्या पक्षाच्या नेत्यांना आणीबाणीवर बोलण्याचा अधिकारच नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ठाण्यात लगावला आणि आणीबाणीच्या समर्थनाबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता करताना ते बोलत होते. ‘सामना’वर बंदी घालण्याची आमची इच्छा नव्हती. पण, त्या मागणीचा आधार घेत ‘आमच्यावर आणीबाणीची परिस्थिती लादण्यासाठी दबाव आणला जात आहे,’ असा आव शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आणला असला, तरी ज्या वेळी आणीबाणी लादली, तेव्हा याच शिवसेनेने आणीबाणीचे समर्थन केले होते, असा दाखला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे थेट शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.ठाण्यात सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या पटांगणावर आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ठाण्यात शिवसेनारूपी रावणाचे दहन करा, असे आवाहनही त्यांनी केले. ज्या वेळी देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा माझे आजोबा आणि वडील तुरुंगात गेले होते. कारण, आम्हाला लोकशाही हवी होती, परंतु शिवसेनेने आणीबाणीला समर्थन दिले होते. यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बंदिस्त करण्याचा प्रयत्न झाला, त्याला विरोध करत आमचे स्वयंसेवक दोनदोन वर्षे तुरुंगात गेले. त्यामुळे आज लोकशाही जिवंत ठेवण्यात आमचा मोलाचा वाटा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आमच्या सिंहाची-भाजपाची ताकद आम्हाला माहीत होती, परंतु काही काळ हा सिंह हरवला होता आणि तो बकरीच्या कळपात गेला होता. आता तो स्वतंत्र झाला आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)