शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

वेतन अनुदानातील जाचक अटींमुळे शिक्षक नाराज; तीव्र आंदोलनाचा संघटनांचा इशारा

By admin | Updated: September 20, 2016 04:22 IST

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान देण्यासंदर्भातील जीआर सोमवारी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने जारी केला.

मुंबई : विनाअनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान देण्यासंदर्भातील जीआर सोमवारी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने जारी केला. मात्र या जीआरमध्ये अनेक जाचक अटींचा समावेश केल्याने ९० टक्क्यांहून अधिक पात्र शाळांना अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. परिणामी जीआरमधील त्रुटी दूर केल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.याआधी ३० आॅगस्ट रोजी मंत्रिमंडळाने विनाअनुदानित शाळांना १४३ कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र त्यासंदर्भातील जीआर काढला नव्हता. त्यामुळे राज्यभर शिक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी तर थेट मंत्रालयातच शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या दालनासमोर प्राणांकित आंदोलन सुरू केले. जीआर काढला नाही, तर कॅबिनेटसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता. त्यानंतर शासनाने २० टक्के अनुदानाचा जीआर काढला. शासन निर्णयामुळे राज्यातील १ हजार ६२८ शाळांना व २,४५२ तुकड्यांना २० टक्के सरसकट अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. (प्रतिनिधी)