शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत मराठा क्रांतीचा एल्गार

By admin | Updated: September 30, 2016 02:21 IST

कोपर्डीच्या घटनेतील आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्या, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा, मराठा समाजाला आरक्षण द्या, शेतकऱ्यांच्या शेतीमाला हमीभाव द्या आदी

बारामती : कोपर्डीच्या घटनेतील आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्या, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा, मराठा समाजाला आरक्षण द्या, शेतकऱ्यांच्या शेतीमाला हमीभाव द्या आदी मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा बारामतीत धडकला. या मोर्चाचे नेतृत्व महाविद्यालयीन युवतींनी तसेच महिलांनी केले. शहरात भगवामय वातावरणात ‘नि:शब्द हुंकार’ राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम लाखोच्या संख्येने आलेल्या मराठा बांधवांनी केले. सकाळी १०.३० वाजता कसबा येथील शिवाजी उद्यानामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शीला भोंडवे, ऐश्वर्या गाडेकर, विशाखा काकडे, वर्षाराणी ढमे, ऋतुजा गुळूमकर या युवतींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी गीतांजली वाघ, श्रुती वाघ, ईश्वरी साळुंके यांनी राजमाता जिजाऊ यांना वंदन केले. सुरुवातीला महाविद्यालयीन युवती, त्यानंतर महिला व त्यांच्या मागे युवक आणि पुरुष मंडळी शिस्तबद्धरीत्या सभास्थानी आले. मिशन हायस्कूलच्या प्रांगणात ७ युवतींनी प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. बारामती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली. (प्रतिनिधी)कोपडीर्तील पीडितेचे कुंटुंबियही सहभागीकोपर्डीतील घटनेतील पीडित मुलीच्या आई-वडिलांसह अन्य कुटुंबीयदेखील मोर्चात सहभागी झाले होते. यासह पवार कुटुंबातील सुनेत्रा पवार, सुनंदा पवार, शर्मिला पवार आदी सहभागी झाल्या होत्या. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ हेदेखील मोर्चात सहभागी होते.