शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांचा गोंधळ कायम

By admin | Updated: July 26, 2016 19:53 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केलेल्या (नॉट रिपोर्टेड) ७० हजार विद्यार्थ्यांना मंगळवारी प्रवेशाचा मेसेज मिळाला नाही.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २६ : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केलेल्या (नॉट रिपोर्टेड) ७० हजार विद्यार्थ्यांना मंगळवारी प्रवेशाचा मेसेज मिळाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा उपसंचालक कार्यालयात धाव घेतली. मात्र, केवळ नॉट रिर्पोटेड म्हणून सूचना देणारा मेसेज ७० हजार विद्यार्थ्यांना पाठवला असून, बुधवारी रिक्तजागांची माहिती देणारा मेसेज पाठवणार असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगितले.

बुधवारी मेसेज आलेल्या विद्यार्थ्यांनी बुधवार व गुरुवार या दोन दिवसांच्या कालावधीत, संबंधित महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचा सल्ला, सहायक शिक्षण संचालक राजेंद्र अहिरे यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले की, ह्यज्या महाविद्यालयांत जागा असतील, त्याच महाविद्यालयांतील नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांना मेसेज पाठवण्यात येतील. ज्याविद्यार्थ्यांना रिक्त जागेचा मेसेज येईल, त्यांनी त्या-त्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. इतर विद्यार्थ्यांनी ८आॅगस्टनंतर पुन्हा एकदा आॅनलाइन प्रवेशाचा अर्ज भरायचा आहे, त्यांनी ९ ते १३ आॅगस्टदरम्यान आणखी एक संधी दिली जाईल.

रिक्त जागांची आकडेवारी एक लाखाहून अधिक आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील, असेही अहिरे यांनी सांगितले. अर्धवट अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना हा मेसेज येणार नाही. त्यांनी ३० जुलै ते २ आॅगस्टदरम्यान जुन्याच लॉगीन आयडीवर अपूर्ण अर्ज पूर्ण भरायचा आहे. विद्यार्थ्यांना दिलेल्या माहिती पुस्तिकेमधील मार्गदर्शन केंद्रावर जाऊन अधिक माहिती घ्यावी, याउलट दूरचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ९ आॅगस्टपासून विशेष फेरी आयोजित केली आहे. या फेरीत सर्वच विद्यार्थ्यांना शेवटची संधी दिली जाईल. परिणामी, विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक माहिती भरून आॅनलाइन अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.