शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी आॅनलाईन प्रवेश, ७० हजार विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी

By admin | Updated: July 21, 2016 21:58 IST

अकरावी आॅनलाईन प्रवेशाच्या घोळामुळे हजारो विद्यार्थी आणि त्यांचे पालक सध्या चिंतेत आहेत. चौथ्या फेरीअखेर अजूनही ७० हजार विद्यार्थ्यांनी विविध कारणांनी प्रवेश

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 21 - अकरावी आॅनलाईन प्रवेशाच्या घोळामुळे हजारो विद्यार्थी आणि त्यांचे पालक सध्या चिंतेत आहेत. चौथ्या फेरीअखेर अजूनही ७० हजार विद्यार्थ्यांनी विविध कारणांनी प्रवेश घेतलेला नाही. १ लाख १३ हजार १६१ विद्यार्थ्यांना प्रथम आणि द्वितीय पसंतीक्रम असलेले कनिष्ठ महाविद्यालय अलॉट करण्यात आले आहे. तर १ लाख ५३ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला आहे. परिणामी या विद्यार्थ्यांसाठी विशेष आॅनलाईन फेरीची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र अकरावीचे कोणतेही प्रवेश आॅफलाईन पद्धतीने होणार नाहीत; याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्णत: आॅनलाईन होत आहे. अकरावी प्रवेशाची जाहिरात २२ जुलै रोजी वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली जाईल. कॉलेज अलॉट करूनही प्रवेश घेतलेला नाही अशा विद्यार्थ्यांना अलॉट झालेल्या महाविद्यालयात जागा रिक्त असल्यास या महाविद्यालयांकडे संपर्क साधण्यासह एसएमएस पाठविणे आणि मूळ लॉगिनचा संदेश २५ जुलैपर्यंत पाठवण्यात येईल. अलॉट झालेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यानंतर महाविद्यालयाला संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे अपलोडिंग २८ जुलैपर्यंत करावे लागणार आहे. 

आॅनलाईन प्रवेशाची पाचवी फेरी...ज्या विद्यार्थ्याने अर्ज भरलेले नाहीत. किंवा अर्धवट अर्ज भरले आहेत. शिवाय अ‍ॅलोकशन झालेले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन प्रवेशाची पाचवी फेरी होणार आहे. प्रवेश अर्ज सादर करणे - ३० जुलै ते २ आॅगस्टगुणवत्ता यादी जाहीर करणे - ४ आॅगस्टसंबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणे - ५ आणि ६ आॅगस्टपसंतीचे कॉलेज मिळवण्याची संधी...ज्या विद्यार्थ्यांना दूरचे महाविद्यालय मिळालेले आहे. ज्यांनी विषय चुकीचा निवडलेला आहे. ज्यांना शाखा बदलयाची आहे. शिवाय ज्यांचा प्राधान्यक्रम चुकला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठीही विशेष प्रवेश फेरी असणार आहे. जुलै महिन्यात झालेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी शिवाय एटीकेटीचे विद्यार्थी आणि उर्वरित विद्यार्थ्यांसाठीही याचा फायदा होईल. मात्र, यासाठी ९ ते ११ आॅगस्ट दरम्यान नव्याने नोंदणी करुन फी भरणे आवश्यक असल्याचे मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी म्हटले आहे. नोंदणी करुन फी भरणे - ९ ते ११ आॅगस्टपहिली विशेष फेरी -९ ते १३ आॅगस्टदुसरी विशेष फेरी -१८ ते २३ आॅगस्टतिसरी विशेष फेरी -२५ ते ३० आॅगस्ट