शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

बेस्टकडून वीज ग्राहकांची लूट?

By admin | Updated: September 18, 2016 01:19 IST

परिवहन तूट वसूल करणे बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतरही गेले तीन महिने ही बेकायदा वसुली सुरूच असल्याची धक्कादायक बाब उघड झाली

मुंबई : शहर भागातील वीज ग्राहकांकडून परिवहन तूट वसूल करणे बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतरही गेले तीन महिने ही बेकायदा वसुली सुरूच असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. आतापर्यंत बेस्टने अशा पद्धतीने दहा लाख वीज ग्राहकांकडून १८३ कोटी रुपये वसूल केले आहेत.बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग गेली काही वर्षे आर्थिक नुकसानात आहे. ही तूट वीजपुरवठा विभाग ग्राहकांच्या वीज बिलातून वसूल करीत आहे. मात्र तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी ही तूट वसूल बंद करण्याचे आदेश बेस्टला दिले होते. त्यानुसार गेली काही वर्षे सुरू असलेली ही बेकायदा वसुली तत्काळ बंद होणे अपेक्षित होते. मात्र गेल्या तीन महिन्यांमध्ये बेस्टने या स्वरूपात ग्राहकांकडून तब्बल १८३ कोटी रुपये वसूल केले आहेत, ही बाब बेस्ट समितीच्या बैठकीत शनिवारी समोर आली. या प्रकरणात एखादी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्यास वसूल केलेली ही रक्कम बेस्टला तत्काळ परत करावी लागेल. अशा वेळी एवढी मोठी रक्कम कुठून देणार, असा सवाल सदस्यांनी केला. परंतु तूट वसुलीचा मुद्दा महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगापुढे असल्याने याबाबत आता बोलणे उचित नाही, अशी सबब देत बेस्ट प्रशासनाने आपला बचाव केला. (प्रतिनिधी)>परिवहनचा तोटा वीज ग्राहकांच्या माथीकुलाबा ते सायन व चर्चगेट ते माहीम या भागांमध्ये बेस्टमार्फत १० लाख ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो.सुमारे तीन हजार कोटींचा कर्जाचा डोंगर आणि आर्थिक तूट यामुळे बेस्टचा परिवहन विभाग हजार कोटी रुपयांच्या तुटीत आहे.वीज मीटरमध्ये घोटाळा?एकीकडे आर्थिक तूट भरून काढण्यासाठी बेस्ट वीज ग्राहकांकडून परिवहन तूट वसूल करीत असताना सहा हजार वीज मीटर बऱ्याच काळपासून बंद आहेत. हॉटेल्स व व्यावसायिक वीज ग्राहकांचा यामध्ये समावेश असल्याने हा एखादा घोटाळा असण्याचा संशय बेस्ट समिती सदस्यांनी व्यक्त केला आहे. मात्र प्रशासनाने हा आरोप फेटाळून लावला आहे.सहा हजारांहून अधिक ग्राहक गेले काही काळ बेस्टची वीज मोफत वापरत असण्याची शक्यता आहे. वीज मीटर शून्य रीडिंग दाखवत असल्याने अशा सहा हजार ग्राहकांना अंदाजे वीज बिल पाठविले जात आहे. या गोंधळामागे एखादे रॅकेट असण्याची शक्यता बेस्ट समिती सदस्यांनी व्यक्त केली. यामध्ये अधिकारीही गुंतले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.