शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

24 ऑगस्टला कल्याण तालुक्‍यात सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार

By admin | Updated: July 31, 2016 14:38 IST

राज्य निवडणूक आयोगाने मुंबई ग्रामपंचायत (निवडणूक) नियम 1959 मधील नियम 7 मधील पोट नियम 1 अन्वये कल्याण तालुक्‍यातील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम 24 ऑगस्ट रोजी

उमेश जाधवटिटवाळा - राज्य निवडणूक आयोगाने मुंबई ग्रामपंचायत (निवडणूक) नियम 1959 मधील नियम 7 मधील पोट नियम 1 अन्वये कल्याण तालुक्‍यातील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम 24 ऑगस्ट रोजी जाहिर करण्यात आला आहे. फळेगांव, रुंदे, उशिद, मामनोली, दहिवली आवडली, केळणी कोलिंब या ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे. या कामी कल्याण तहसिलदार कार्यालयीन यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच गाव पातळीवर निवडणूकीसाठी मोर्चे बांधणी तर काही ठिकाणी निवडणूक बिनविरोध कशी होईल यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत.

तालुक्‍यातील फळेगाव, उशिद या पंचायतींच्या निवडणुका गेली 15 वर्षे ग्रामस्थांच्या सहकार्याने बिनविरोध पार पाडल्या आहेत. त्याच धर्तीवर या वेळीही पंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी बैठका घेणे सुरू केले आहे. यात फळेगांव ग्रामस्थांनी बैठक घेतली असून ही ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशा प्रकारच्या बैठका इतर ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी घेऊन सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणूका शांततेत पार पाडाव्यात अशा प्रकारचे मत तहसिलदार किरण सुरवसे यांनी "लोकमतशी" बोलताना व्यक्त केली.

त्या परिने आम्ही राजकिय पक्ष कार्यकर्ते यांना देखील आवाहन आहे. तसेच ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्यासाठी स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी ग्रामस्थांना आवाहन करणारे पत्र या सहा ग्रामपंचायतींच्या गावातील घरोघरी वाटप केले आहे. पंचायत निवडणुका बिनविरोध करून गावातील सामाजिक सलोखा आणि ऐक्‍य कायम ठेवा, ग्रामपंचायत निवडणुका याच गावातील संघर्ष आणि तणावाचे कारण आहे. गावांच्या सर्वांगीण विकासाला त्यामुळे खीळ बसते, असे या पत्रकात म्हटले आहे. बुधवार दिनांक 3 ते 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागविणे व सादर करणे.

7 ऑगस्ट सार्वजनिक सुट्टीचा रवीवार वगळण्यात आला आहे. 10 ऑगस्ट रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी, तर 12 ऑगस्ट रोजी दुपारी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. तसेच याच दिवशी चिन्हे वाटप करण्यात येणार असून निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. बुधवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार असून मतमोजणी 29 ऑगस्ट रोजी होणार आहे.

यावेळी देखील मतदार यादीतील घोळ या वेळीही कायम आहे. त्यामुळे प्रभाग वगळून अन्यत्र नावे गेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. सध्या काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या या निवडणुकांकडे जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून देखील पाहिले जात आहे.