शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूकीत आघाडीला बंडखोरांचे आव्हान

By admin | Updated: December 10, 2015 02:45 IST

विधानपरिषदेच्या आठ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांव्यतिरिक्त इतरांनीही अर्ज दाखल करून

मुंबई : विधानपरिषदेच्या आठ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांव्यतिरिक्त इतरांनीही अर्ज दाखल करून बंडखोरीचे निशाण फडकावले आहे. मात्र, १२ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असल्याने त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. विधान परिषदेच्या ८ जागांसाठी २७ डिसेंबरला मतदान होणार असून बुधवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई, सोलापूर, कोल्हापूर आणि अहमदनगर येथे आघाडीच्या उमेदवारांपुढे बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे. मुंबईची जागा कॉंग्रेसकडे असून भाई जगताप यांनी दोन दिवसांपूर्वीच आपला अर्ज दाखल केला आहे. मात्र आज राष्ट्रवादीचे प्रसाद लाड यांनीही अर्ज दाखल केल्याने आघाडीत चलबिचल सुरू झाली आहे. ‘माझी उमेदवारी म्हणजे बंडखोरी नाही. मी पक्षाचा राजीनामा देऊन अर्ज भरला आहे. एकूण १० अपक्ष नगरसेवकांनी मला पाठिंबा दिला आहे आणि अजून काही नगरसेवक संपर्कात आहेत, असा दावा लाड यांनी केला. तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार महादेव महाडिक यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार सतेज पाटील यांच्या विरोधात बंडाचा झेंडा उभारला आहे. अहमदनगरची जागा राष्ट्रवादी लढणार असून पक्षाने अरुण जगताप यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. असे असताना तेथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. ससाणे काँग्रेसचे माजी आमदार आणि साई संस्थानचे माजी अध्यक्ष आहेत. सोलापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिपक साळुंखे यांच्याविरोधात काँग्रेसचे दिलीप माने यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजपा-शिवसेना-स्वाभिमानी पुरस्कृत उमेदवार म्हणून प्रशांत परिचारक यांनी अर्ज दाखल केला.