शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हुजलंती गटाची निवडणूक लक्षवेधी ठरणार

By admin | Updated: February 17, 2017 20:31 IST

मंगळवेढा तालुका : ढोबळे यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत

हुजलंती गटाची निवडणूक लक्षवेधी ठरणारविलास मासाळ - मंगळवेढा :

मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती जि़ प़ गटाला माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे अधिक महत्व आले आहे़ या गटात दुरंगी होणारी लढत ढोबळे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे आता तिरंगी होणार आहे़ शिवाय ही निवडणूक लक्ष्मणराव ढोबळे यांच्या प्रतिष्ठेची मानली जात आहे़ हुलजंती जि़ प़ गटामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या पाठींब्यावर अनुराधा ढोबळे या निवडणूक अपक्ष म्हणून लढवित आहेत. आवताडे गटाच्या जनहित विकास आघाडी मंगळवेढा यांच्या वतीने शीला सचिन शिवशरण तर अपक्ष म्हणून कविता दत्तात्रय खडतरे या निवडणूक रिंगणात आहेत़ खरी लढत ही अनुराधा ढोबळे विरूध्द शीला शिवशरण यांच्यामध्ये होणार आहे. या जि़ प़ गटात अनुराधा ढोबळे या कोणत्या पक्षाकडून लढतात की बिनविरोध होतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत काँगे्रस, राष्ट्रवादी, पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी यांनी उमेदवार दिला नव्हता व अन्य अपक्ष उमेदवारांनी अनुराधा ढोबळे यांच्या विरोधातील अर्ज माघारी घेतल्याने त्या बिनविरोधातील होतील, असा अंदाज कार्यकर्त्यांमध्ये होता. बिनविरोध होण्यासाठी लक्ष्मणराव ढोबळे यांनी अर्ज भरल्यापासून अनेक उमेदवारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला व विनंत्याही केल्या़ अखेरपर्यंत त्यांनी प्रत्येक उमेदवाराच्या घरापर्यंत कार्यकर्त्यांना पाठविले. मात्र शेवटपर्यंत त्यांना पत्नी अनुराधा ढोबळे यांना बिनविरोध करण्यासाठी सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. अखेर एकदाची निवडणूक लागली़ सध्या हुलजंती गटात तिरंगी लढत होत आहे़ आवताडे गटाच्या जनहित विकास आघाडी मंगळवेढातर्फे शीला शिवशरण यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून अनुराधा ढोबळे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे़ या शिवाय दुसऱ्या अपक्ष उमेदवार कविता खडतरे या निवडणूक रिंगणात आहेत़ त्या कोणाची मते खेचणार यावर बरेच अवलंबून आहे़ सध्या या गटातील उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे़ उर्वरित दोन दिवसांत कोण, कोणती राजकीय खेळी करणार? यावर या गटातील उमेदवारांचे भवितव्य असेल़ बिनविरोध होण्याऐवजी लागली निवडणूकहुलजंती जि़ प़ गटातील सर्व कार्यकर्त्यांना व मतदारांना आ. भारत भालके, आ. प्रशांत परिचारक, दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे या तिघांनीही आपल्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार देणार नाही, असे प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी आवर्जुन सांगितले होते, मात्र आवताडे गटाच्याच उमेदवाराने अखेरपर्यंत अर्ज माघारी घेत नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याऐवजी निवडणूक लागली आहे. त्यामुळे ही निवडणूक आता लक्षवेधी ठरणार आहे़ आता हीच निवडणूक तालुक्यात सर्वाधिक चर्चेली जात आहे़ या निवडणुकीत लक्ष्मणराव ढोबळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे़ हुलजंती, मरवडे गणात तिरंगी लढतहुलजंती गणामध्ये रेणुका भगवानराव जाधव-पाटील (अपक्ष), चन्नम्मा गुरुनिंगप्पा बिराजदार (भाजप), सुधाकर प्रेरणा मासाळ (जनहित विकास आघाडी मंगळवेढा), महादेव जकाप्पा सोमुत्ते राष्ट्रवादी (काँग्रेस) अशी तिरंगी लढत होणार आहे. तसेच मरवडे गणामध्ये ही चंद्रकांत एकनाथ इंगळे (भाजप), प्रकाश अरूण काळुंगे (काँग्रेस), प्रदीप वसंत खांडेकर (जनहित विकास आघाडी मंगळवेढा) अशी तिरंगी लढत होत आहे़