शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांचा परदेश प्रवास होणार सुलभ

By admin | Updated: August 17, 2016 01:16 IST

ज्येष्ठ नागरिकांना पासपोर्ट व्हेरिफिकेशनच्या कामासाठी आता पोलीस ठाण्यात जाण्याची अजिबात गरज नाही़ पोलीस कर्मचारी अथवा उपनिरीक्षक दर्जाचा अधिकाऱ्याने ज्येष्ठ नागरिकांच्या

पुणे : ज्येष्ठ नागरिकांना पासपोर्ट व्हेरिफिकेशनच्या कामासाठी आता पोलीस ठाण्यात जाण्याची अजिबात गरज नाही़ पोलीस कर्मचारी अथवा उपनिरीक्षक दर्जाचा अधिकाऱ्याने ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करावे, असा आदेश दिला असल्याचे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले़ त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या १०९० या हेल्पलाईनचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या़ या कार्यक्रमाला सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, अपर पोलीस आयुक्त सी़ एच़ वाकडे, बीएसएनएलचे महाव्यवस्थापक डॉ़ पी़ के़ होता, पोलीस उपायुक्त पी़ आऱ पाटील, सहायक पोलीस आयुक्त अरुण वालतुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी आदी उपस्थित होते़ पासपोर्ट काढण्यासाठी पासपोर्ट कार्यालयात फॉर्म भरल्यानंतर सबंधित व्यक्तीचे स्थानिक पोलिसांकडून व्हेरिफिकेशन केले जाते. संबंधित व्यक्ती नमूद पत्त्यावर राहावयास आहे की नाही, राहावयास असल्यास किती दिवसापासून, यासह इतर माहितीची खातरजमा करून घेण्यासाठी ही पडताळणी केली जाते. यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना व्हेरिफिकेशनच्या कामासाठी पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागत. रश्मी शुक्ला म्हणाल्या, की शहरातील ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा ह ेआमचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे़ शहर पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी प्रत्येक पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आली असून, त्यांना ओळखपत्र देण्याचेदेखील काम सुरू करण्यात आले आहे. शहरात जवळपास ५ ते ६ लाख ज्येष्ठ नागरिक असल्याचे निदर्शनास आले आहे़ पण, त्यांपैकी खूपच थोड्यांची नोंदणी आमच्याकडे झाली आहे़ ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केल्यास त्या-त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना आपल्या भागातील नागरिकांना कशा प्रकारची सुरक्षा देता येईल, हे ठरविणे सोपे जाईल़ प्रत्येक पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि अडचणी सोडविण्यासाठी एक अधिकारी व चार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या इतर अडचणी व समस्या १०९० या हेल्पलाईनवर सांगाव्यात़ याशिवाय, पुणे पोलिसांच्या वेबसाईट, टिष्ट्वटर, फेसबुकवरही ते आपल्या समस्या व सूचना देऊ शकतील़ कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक शरदचंद्र साठे यांनी १०९० या हेल्पलाईन क्रमांकावर फोन केला. आयुक्त रश्मी शुक्ला यांनी तो स्वीकारून हेल्पलाईनचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन केले. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पी.आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सहाय्यक आयुक्त अरुण वालतुरे यांनी आभार मानले़ ज्येष्ठ नागरिक कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सूत्रसंचालन केले.