शहरं
Join us  
Trending Stories
1
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
2
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
3
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
4
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
5
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
6
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
7
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
8
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
9
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
10
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
11
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
12
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
13
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
14
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
15
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
16
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
17
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."
18
"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद
19
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
20
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 

गुरुकुल क्लासेसचा ओंकार देशपांडे देशात आठवा

By admin | Updated: June 12, 2017 02:25 IST

जेईई अ‍ॅडव्हान्सच्या रविवारी (दि.११) घोषित झालेल्या निकालात निर्मल बिस्वाल यांच्या गुरुकुल क्लासेसचा विद्यार्थी ओंकार देशपांडे याने देशात आठवा क्रमांक पटकावला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जेईई अ‍ॅडव्हान्सच्या रविवारी (दि.११) घोषित झालेल्या निकालात निर्मल बिस्वाल यांच्या गुरुकुल क्लासेसचा विद्यार्थी ओंकार देशपांडे याने देशात आठवा क्रमांक पटकावला.देशपातळीवरील अभियांत्रिकीच्या आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत निर्मल बिस्वाल यांच्या गुरुकुल क्लासेसने घवघवीत यश मिळविले. क्लासेसचे तब्बल ७० टक्के विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले. आयआयटी फाउंडेशन कोर्सपासून क्लासचा विद्यार्थी असलेल्या ओंकार देशपांडे याने अभ्यासात सातत्य कायम ठेवून देशपातळीवर आठवा क्रमांक पटकावला. यासोबतच तब्बल २८ विद्यार्थ्यांनी निकालात देशपातळीवर उत्तम क्रमांक पटकावण्यात यश मिळविले. निकालाची घोषणा होताच जालना रोडवरील क्लासच्या मुख्य इमारतीसमोर जल्लोष करण्यात आला. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात मिठाई वाटून स्वागत करण्यात आले. या वेळी क्लासेसचे आजी-माजी विद्यार्थी, शिक्षकांनी आनंदोत्सवात सहभाग नोंदवला. निर्मल यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार केला. क्लासेसचे बहुसंख्य विद्यार्थी आयआयटीमध्ये प्रवेशास पात्र ठरतील, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.ओंकार देशपांडे हा २० एप्रिल २०१३ला फाउंडेशन कोर्ससाठी गुरुकुल क्लासेसला जॉइन झाला. त्याच्या अभ्यासातील उत्तम कामगिरीमुळे बिस्वाल यांनी त्याला ११वी व १२वीसाठीची ‘सुपर-३०’ या स्कॉलर बॅचला प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित केले. गुरुकुलमध्ये त्याचा रोल नंबर जीसी १७११० तर जेईई अ‍ॅडव्हान्सचा रोल नंबर १०२१२२४ असा होता. अकरावीमध्ये असताना त्याने केव्हीपीवायमध्ये देशात २४वा क्रमांक पटकावला. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आॅलिम्पियाड परीक्षांमध्ये पात्र ठरण्यासोबतच ओंकारने अ‍ॅस्ट्रोनॉमी आॅलिम्पियाडमध्ये देशात १०वा क्रमांक मिळविला आहे. ‘बीटसॅट’मध्ये त्याचा स्कोर ४५०पैकी ४३८ असा आहे. यासोबतच एमएचसीईटीमध्ये त्याला २००पैकी १९२ गुण मिळाले असून, आयआयटी-जेईई परीक्षेत इतिहास घडवत देशातून ८व्या क्रमांकावर आहे.