शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्याच्या अपहरणप्रकरणी आठ जणांना जन्मठेप

By admin | Updated: August 24, 2016 03:57 IST

पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी निफाड सत्र न्यायालयाने आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

नाशिक : पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी निफाड सत्र न्यायालयाने आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने तपासास अनेक त्रुटी राहिल्याचे निरीक्षण नोंदवित महासंचालकांना पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.पिंपळगावचे व्यापारी शंकर मूलजी ठक्कर यांचे १९ डिसेंबर २०१२ मध्ये खंडणीसाठी कांद्याच्या चाळीमधून अपहरण झाले होते. अपहरणकर्त्यांनी ठक्कर यांचा भाऊ करसन यांच्याकडे १५ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून खरशिंदे (अहमदनगर) गावात पाच कोटींच्या रोकडसह एकू ण ११ आरोपींना अटक केली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाइल टॉवर लोकेशन घेऊन आरोपींचा माग काढला होता.खटल्याची सुनावणी निफाड सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. जे. मंत्री यांच्यासमोर झाली. खटल्यासाठी सरकारने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अजय मिसर यांची नियुक्ती केली होती. त्यांनी सरकारी पक्षातर्फे २१ साक्षीदार तपासले. त्यात आरोपींविरूद्ध सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने न्यायालयाने आठही आरोपींना जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी) >पाच कोटी देऊन तडजोडकरसन यांनी भावाची सुटका करण्यासाठी आरोपींना खरशिंदे शिवारात पाच कोटी दिले होते. त्यानंतर आरोपींनी ठक्कर यांना त्यांच्याकडे सोपविले. मात्र शंकर यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा होत्या, हाच मोठा पुरावा ठरला. >सामान्य नागरिकांत दहशतखंडणी वसुलीसाठी व्यापाऱ्यांच्या मुलांचे अपहरण करणे, तसेच धारदार शस्त्राचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे वाढत आहे. न्यायालयाच्या निकालामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल. पोलिसांनी गुन्ह्यांचा गांभीर्याने सखोल तपास करण्यावर भर देण्याची गरज आहे.- अ‍ॅड. अजय मिसर, विशेष सरकारी वकील>निर्दोष सुटका : संशयित सुनील भाऊराव पिठे (१९), कोंडाजी चंद्रभान वाडेकर (२१), बाळासाहेब भागवत वाडेकर (२४) यांच्याविरुद्ध न्यायालयाला सबळ पुरावे आढळून न आल्याने सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोेष सुटका केली आहे. >यांना झाली शिक्षासचिन दामोदर पाटील (२५), तुषार विक्रम बैरागी (२०) (दोघे रा. पिंपळगाव), मुलानी दाऊन हुसेन (२१, रा. पाचोरे वणी), सागर विजय गवळी (२१, रा. बेहेड), अर्जुन मधुकर रहाणे (२५, रा. सुकेणे), योगेश दौलत गडाख (२१, रा. पाचोरे वणी), संतोष मनोहर हतांगळे (२५, रा. शांतीनगर) विश्वजित ऊर्फ सोनू किरण थेटे (२४, रा. शिवाजीनगर) यांना विविध गुन्ह्यांमध्ये जन्मठेप व सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.