शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

तंदुरुस्तीसाठी कैद्यांना मिळणार अंडी

By admin | Updated: October 8, 2016 05:19 IST

शिक्षा भोगत असलेले व कच्च्या कैद्यांना रोज उकडलेली अंडी खाता येणार आहेत.

जमीर काझी,

मुंबई- शिक्षा भोगत असलेले व कच्च्या कैद्यांना रोज उकडलेली अंडी खाता येणार आहेत. श्रावण महिन्यामुळे सध्या अनेकांनी मांसाहार वर्ज्य केला असला तरी जेलमधील कैद्यांना इच्छेनुसार रोज दोन अंडी स्वखर्चाने विकत घेता येतील. त्यांचे आरोग्य सृदढ रहावे, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे तुरुंग प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यात मध्यवर्ती कारागृहासह विविध स्तरावर एकूण २२७ तुरुंग आहेत. त्यामध्ये सुमारे २९ हजारांहून अधिक कैदी राहतात. यापैकी ९ हजार कैदी हे शिक्षा झालेले तर उर्वरित कच्चे (अंडरट्रायल) कैदी आहेत. त्यांना प्रशासनाकडून रोज नाश्ता व दोन वेळा जेवण दिले जाते. त्याशिवाय प्रत्येक तुरुंगात ठेकेदारीवर नेमण्यात आलेल्या कॅन्टीनमधून कैदी स्वखर्चाने जेवण घेऊ शकतो. औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहातील कैदी मुक्ताराम शिंदे याने याबाबत अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केला होता. मध्य विभागाच्या डीआयजीमार्फत तो अप्पर महासंचालक व कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे आला. त्यांनी कैद्यांचे आरोग्य व मानवतेच्या दृष्टिकोनातून कॅन्टीनमध्ये रोज उकडलेली अंडी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. >अंडे खाऊ इच्छिणाऱ्या बंद्यांना दर महिन्याला आगाऊ शुल्क भरावे लागणार आहे. त्याचे दर त्या त्या कालावधीत निश्चित केले जाणार आहेत. मात्र ही सुविधा त्यांना हक्क म्हणून मागता येणार नाही. >मानवतेच्या दृष्टिकोनातून कैद्यांना उकडलेली अंडी त्यांच्या खर्चाने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. मात्र त्याची वेळ ही कारागृहातील दिनचर्या व सोईनुसार निश्चित केली जाईल. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्याबाबतच्या नियमांत भर घातली जाईल. -डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अप्पर महासंचालक व कारागृह महानिरीक्षक