शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिलाची वसुली कार्यक्षमतेने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2017 02:48 IST

ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक असून, त्यासाठी संबंधितांनी अधिक कार्यक्षमतेने काम करण्याची गरज आहे.

मुंबई : ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक असून, त्यासाठी संबंधितांनी अधिक कार्यक्षमतेने काम करण्याची गरज आहे. यात हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिला आहे.महावितरणच्या चार प्रादेशिक संचालकांसह सर्व १६ परिमंडलातील मुख्य अभियंता व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत संजीवकुमार यांनी थकबाकी वसुलीसाठी अधिक गांभीर्याने कार्यरत व्हावे, असे निर्देश दिले आहेत. सध्या महावितरणची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून, थकबाकी वसुलीशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. त्यासाठी सातत्याने वीजवसुली मोहिमा राबवाव्यात, विशेषत: कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांच्या थकबाकी वसुलीबरोबरच, चालू वीजबिल पूर्णपणे वसूल व्हावे, यावर लक्ष केंद्रित करावे, तसेच ज्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे, त्यांचे क्रॉस चेकिंग करून, जर काही ग्राहक गैरमार्गाने वीज घेत असतील, तर त्याच्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. युनिटची वसुली गरजेचीमहावितरणचा कारभार सुरळीत चालण्याकरिता, ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक विजेच्या युनिटची वसुली होणे गरजेचे आहे. दर महिन्याला कोणत्या विभागाने किती वसुली करायची, याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात येत असते.वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देशदर महिन्याची वसुली, ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा बरीच कमी होत असून, याबाबतची कारणेही रास्त नसल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, ही वसुली नेटाने व्हावी, यासाठी सर्व मुख्य अभियंत्यांना वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.ग्राहकांच्या मोबाइल नोंदणीचे प्रमाण वाढवाग्राहकांनी वापरलेल्या विजेचे अचूक बिलिंग होण्यासाठी यंत्रणा सक्षम करावी, ग्राहकांच्या मोबाइल नोंदणीचे प्रमाण वाढवावे, तसेच कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजात मोबाइल अ‍ॅपचा वापर करून, कामात गतिशीलता व पारदर्शकता आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.