शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नॅशनल लॉ स्कूलला ग्रहण !

By admin | Updated: July 1, 2014 01:55 IST

नागपूरमध्ये होऊ घातलेल्या नॅशनल लॉ स्कूलसाठी जिल्हा प्रशासनाने दिलेली जागा केंद्रीय समितीने नाकारली असून ती का नाकारली याची कारणे समितीला विचारली जाणार आहे, असे पालकमंत्री शिवाजीराव

केंद्रीय समितीने दिलेली जागा नाकारली : कारणे विचारणारनागपूर: नागपूरमध्ये होऊ घातलेल्या नॅशनल लॉ स्कूलसाठी जिल्हा प्रशासनाने दिलेली जागा केंद्रीय समितीने नाकारली असून ती का नाकारली याची कारणे समितीला विचारली जाणार आहे, असे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी सांगितले.नागपूरमध्ये नॅशनल लॉ स्कूलला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र यासाठी जागेची उपलब्धता नसल्याचे सांगण्यात येत होते. सोमवारी मोघे यांनी केंद्रीय प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जागांबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात लॉ स्कूलचाही समावेश होता. बैठकीला विभागीय आयुक्त अनुपकुमार व जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्यासह इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.नॅशनल लॉ स्कूलसाठी चिंचोलीची जागा दाखवण्यात आली होती. मात्र केंद्रीय समितीने या जागेला नकार दिला आहे. ही जागा का नाकारण्यात आली याची माहिती समितीने दिली नाही. याबाबत प्रशासनाकडून विचारणा केली जाणार आहे, असे मोघे यांनी सांगितले. ‘ट्रीपल आयटी’साठीही जागा सुचविण्यात आली होती. ती सुद्धा नाकारण्यात आली आहे. मुळात शहरात आणि परिसरात जागेची चणचण आहे. सर्वांनाच दर्शनी भागात जागा हवी असली तरी ती उपलब्ध करून देणे शक्य नाही, असेही मोघे यांनी स्पष्ट केले.दरम्यान मॉरिस कॉलेजमध्ये मुलींच्या वसतिगृहासाठी सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून २०० मुलींची व्यवस्था असणार आहे. जुन्या वसतिगृहाच्या बांधकामासाठी दोन कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती मोघे यांनी दिली. (प्रतिनिधी)वसंतराव नाईक सभागृहासाठीसदरमधील जागेचा प्रस्तावराज्य शासनाकडून निधी प्राप्त झाल्यावरही केवळ जागेच्या अडचणीमुळे थांबलेल्या वसंतराव नाईक जन्मशताब्दी सभागृहाच्या मार्गातील अडचणी दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सभागृहासाठी सदरमधील जुन्या ग्रामीण तहसील कार्यालयाच्या जागेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एकूण सात एकर ही जागा आहे. आर्किटेक्टला ही जागा दाखवण्यात येणार आहे. सभागृहाच्या आराखड्यात किरकोळ बदल करावे लागले तर ते करावे व लवकर प्रस्तावाला मंजुरी द्यावी, अशी सूचनाही यावेळी पालकमंत्र्यांनी केली. वसंतराव नाईक जन्मशताब्दीनिमित्त नागपुरात सभागृह बांधण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच २० कोटी रुपये मंजूर केले आहे.