शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मातृत्वाला बालमृत्यूचे ग्रहण

By admin | Updated: May 14, 2017 07:35 IST

अत्याधुनिक उपचार पद्धतीने देशात असाध्य रोग नियंत्रणात येऊन आयुर्मान वाढले असले तरी अद्यापही आपण बालमृत्यू रोखण्यात पूर्णत: यशस्वी ठरलो नसल्याचे समोर आले आहे.

विशाल शिर्के / ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 14 - अत्याधुनिक उपचार पद्धतीने देशात असाध्य रोग नियंत्रणात येऊन आयुर्मान वाढले असले तरी अद्यापही आपण बालमृत्यू रोखण्यात पूर्णत: यशस्वी ठरलो नसल्याचे समोर आले आहे. देशात अजूनही दर हजारामारे सरासरी ३७ बालकांचा मृत्यू होत असून, महाराष्ट्रात हेच प्रमाण २१ इतके आहे. मूल जन्माला आल्यानंतर एक वर्षांच्या आत जर विवध वैद्यकीय कारणांनी बालकाचा मृत्यू झाल्यास त्याला बालमृत्यू मानला जातो. त्यात अर्भकाला झालेला संसर्ग, विविध आजारांना बळी पडणे आणि इतर वैद्यकीय कारणांचा यात समावेश होतो. प्रसूती दरम्यान अथवा नंतरही योग्य काळजी न घेतल्यास बालके जंतुसंसर्गाला बळी पडण्याची शक्यता असते. पोषण आहारांच्या कमतरतेमुळे विविध रोगांना बालक बळी पडू शकते. लोकमतकडे २००१ ते २०१५ दरम्यानची बालमृत्यूची आकडेवारी हाती आली आहे. त्या नुसार बालमृत्यूच्या प्रमाणात निम्म्याने घट झाली असली तरी अद्यापही दरहजारी बालकांममागे मृत्यू पडणाऱ्या बालकांची संख्या ही वैद्यकीय सेवा आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी याबाबत गंभीर विचार करायला लावणारी आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील बालमृत्यूचे प्रमाण जवळपास दुप्पटी जवळ जाणारे असल्याचे वास्तव आहे. देशात २००१ साली देशात ग्रामीण भागात दर हजारी बालकांमागे ७२ आणि श्हरी भागात ४२ बालकांचा मृत्यू होत असल्याची नोंद आहे. त्या वेळी राज्यात दर हजारी जन्मामागे ग्रामीण भागात ५५, तर शहरी भागात २७ बालकांचा मृत्यू होत होता. या संख्येत २०१५ पर्यंत ग्रामीण भागात ४१ आणि श्हरी भागात २५ पर्यंत घट झालीी आहे. महाराष्ट्रात हेच प्रमाण ग्रामीण भागात २६ आणि शहरी भागात १४ इतके आहे. संख्येत निम्मी घट दिसत असली तरी ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा अजूनही बरीच मागे असल्याचे स्पष्ट होत आहे. जन्मावेळी मुलाचे वजन खूप कमी असणे, प्रसूतीनंतर जंतूसंसर्ग होणे अशा विविध कारणांमुळे बालमृत्यू होत आहे. गेल्या दहा वर्षांची आकडेवारी पाहिल्यास बालमृत्यूच्या प्रमाणात घट होत आहे. राज्यात आदिवासी भागात हे प्रमाण अधिक आहे. बालमृत्यूचे प्रमाण अधिक असलेल्या २५ तालुक्यांत विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालिका अर्चना पाटील यांनी सांगितले. वैद्यकीय सेवेतही केरळ अव्वल - शिक्षणाबरोबरच दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यात केरळा आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. येथील ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही ठिकाणचा बालमृत्यूचा दर देशात कमी आहे. गेल्या पंधरा वर्षांत येथील शहरी आणि ग्रामीण भागातील दरहजारी मृत्यूचे प्रमाण १२ ते १५ दरम्यान राखण्यात येथील वैद्यकीय व्यवस्थेला यश आले आहे.दाम्पत्याने मूल हवय असा विचार केल्यानंतर, आईची ववैद्यकीय तपासणी प्रथम केली पाहीजे. जर संबंधित महिलेला थायरॉईड, रक्तदाब असे काही आजार असल्यास त्यावर उपचार करुन मग आई होण्याचा निर्णय घेणे बाळ आणि आईसाठी चांगले असते. अन्यथा बाळाला धोका होण्याचा संभव असतो. गर्भधारणेनंतर आहार आणि औषधोपचार योग्य होतो की नाही यावरही बरेचकाही अवलंबून असते. तसेच, बाळाच्या जन्मानंतर त्याला वेळच्या वेळेवर डॉक्टरांच्या निगरानीखाली औषधोपचार झाला पाहीजे. अनेकदा सरकारी रुग्णालयात बाळाला औषधांचा डोस दिल्यास पुरेसे असे अनेक पालक मानतात. मात्र, डॉक्टरांचा सल्ला घेणे उपयोगी असते. कारण या दरम्यान डॉक्टर बाळाची प्रकृती देखील तपासत असतो. डॉ. मीनाक्षी देशपांडे, स्त्री रोग तज्ञ तथा सह सचिव इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे