शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

इबोला व्हायरस बी अलर्ट

By admin | Updated: August 12, 2014 01:16 IST

संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या इबोला रोगाचा संशयित रुग्ण भारतातही आढळून आला आहे. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने शासकीय रुग्णालयांना सतर्क (अलर्ट) राहण्याची सूचना केली आहे.

आरोग्य विभाग सतर्क : रुग्णालयांना दिल्या सूचनानागपूर : संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या इबोला रोगाचा संशयित रुग्ण भारतातही आढळून आला आहे. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने शासकीय रुग्णालयांना सतर्क (अलर्ट) राहण्याची सूचना केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयानेही (मेडिकल) या संदर्भात नुकतीच बैठक घेऊन उपाययोजनांच्या सूचना दिल्या आहेत.इबोला या रोगासंदर्भात संयुक्त राष्ट्र आरोग्य संघटनेतर्फेहाय अलर्ट जारी केला आहे. या रोगाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव हा आफ्रिका खंडातील देशात आढळून आला आहे. पश्चिम आफ्रिकन देश गिनी, सियरा लियॉन आणि लायबेरियामध्ये इबोला व्हायरसचा वाढता धोका बघता जागतिक आरोग्य संघटनेने चिंता दर्शविली आहे. विशेष म्हणजे इबोला हा व्हायरस नियंत्रणाबाहेर जात असून अन्य राष्ट्रांमध्ये देखील पसरू शकतो अशी भीती संघटनेने व्यक्त केली आहे. त्यानुसार भारतातही अलर्ट जारी केला आहे. चेन्नई विमानतळावर संशयित रुग्ण आढळून आल्याने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. यात संशयित रुग्ण दिसल्यास त्याचे रिपोर्र्टिंग, घ्यावयाची काळजी, दिसत असलेल्या लक्षणांवरून उपचार आदींची माहिती देण्यात आली आहे.-मेडिकलमध्ये ‘इबोला’वर बैठकशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) प्रशासनाने शनिवारी ‘इबोला’ रोगाबाबत बैठक घेतली. यात संशयित रुग्ण आढळून आल्यास वॉर्ड क्र. २५ मध्ये स्वतंत्र खोलीची व्यवस्था, आवश्यक औषधे, उपकरणे यावर चर्चा केली. तसेच बाह्यरुग्ण व आकस्मिक विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.(प्रतिनिधी)