शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

अ'नाथ', पक्षाच्या होर्डिंग्सवरुन एकनाथ खडसे गायब

By admin | Updated: June 12, 2016 14:33 IST

नाशिक येथे लावण्यात आलेल्या पोस्टर वर फडणवीस, गडकरी, दानवे यांच्यापासून स्थानिक सर्व नेते मंडळींचे फोटो लावण्यात आले होते. मात्र, एकाही पोस्टरवर एकनाथ खडसे दिसत नव्हते.

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. १२ : राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना राजीनामा देऊन आठवडा उलटला नाही, तोच भाजपाच्या होर्डिंग्सवरुनही खडसे गायब झाल्याचे दिसून येत आहे. पक्षाला त्यांचा विसर पडला का असा सवाल माध्यमातून आणि सर्वसामान्य जनतेतून केला जात आहे. तर  महसूल मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागल्यावर भाजप एकनाथ खडसे यांच्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करत असल्याची जोरदार चर्चा भाजप आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. हा प्रकार भाजपने नाशिक येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात घडला.
 
नाशिकच्या वसंत स्मृती येथील भाजप कार्यालयात अनुसूचित जमात मोर्चा विस्तार व पदग्रहण समारंभ सोहळ्यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आले होते. या कार्यक्रमासाचे मोठ्या उस्ताहात आयोजन करण्यात आले होते. त्यात भाजपने लावलेली कार्यक्रमाची पोस्टर्सही उठून दिसत होती. मात्र, संपूर्ण कार्यक्रमभर कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा सुरू होती. ती म्हणजे भाजपच्या पोस्टर्सवरून एकनाथ खडसे यांचे गायब होणे.
 
 
नाशिक येथे लावण्यात आलेल्या पोस्टर वर फडणवीस, गडकरी, दानवे यांच्यापासून स्थानिक सर्व नेते मंडळींचे फोटो लावण्यात आले होते. मात्र, एकाही पोस्टरवर एकनाथ खडसे दिसत नव्हते. 
 
 
दरम्यान, याबाबत मंत्री सावरा यांच्याकडे प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता, ‘चूक झाली असेल तर दुरुस्ती करू’, असे सांगत त्यांनी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच, ‘एकनाथ खडसे हे राज्यातील मोठे नेते आहेत. ते ४० वर्षे राजकारणात आहेत. त्यांच्याबद्दल आकस नसून प्रोटोकॉलनुसार त्या त्या वेळी वागावं लागतं’, असेही त्यांनी या वेळी सांगितलं.