शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

ई-निविदेत टक्केवारीचा कारभार

By admin | Updated: September 5, 2016 02:05 IST

विभागस्तरावर नागरी कामांत नगरसेवक, ठेकेदार व अधिकाऱ्यांमध्ये संगनमताने भ्रष्टाचार होत असल्याचे बोलले जात होते़

मुंबई : विभागस्तरावर नागरी कामांत नगरसेवक, ठेकेदार व अधिकाऱ्यांमध्ये संगनमताने भ्रष्टाचार होत असल्याचे बोलले जात होते़ हा गैरकारभार रोखण्यासाठी ई-निविदा पद्धत आणण्यात आली़ मात्र यामुळे पालिकेचा कारभार पारदर्शक होण्याऐवजी ई-निविदेच्या नावाखाली सुरू असलेला भ्रष्टाचार उघड करणारी आॅडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल झाल्याने हा टक्केवारीचा व्यवहार तेजीत आहे़ वॉर्डस्तरावरील झोपडपट्ट्या, चाळी, विभागांतील लाद्या बसविणे, पायवाटा तयार करणे, मोरीची दुरुस्ती, पदपथ व शौचालयांची कामे अशी छोटीछोटी कामे नगरसेवक निधीतून होत असतात़ या अंतर्गत ३ ते २० लाख रुपयांपर्यंतची कामे केली जात असतात़ मात्र आतापर्यंत या कामांसाठी मागविलेल्या निविदांचे पाकीट खोलून कंत्राट देण्यात येत होते़ यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होऊ लागला़ पालिकेच्या मुख्य लेखापालांनी गोपनीय टिपणीतून विभागस्तरावर सुरू असलेला हा भ्रष्टाचार उघड केला होता़ मात्र यामुळे नगरसेवकांमध्ये संतापाची लाट उसळून त्या अधिकाऱ्याला माफी मागण्यास भाग पाडण्यात आले होते़ या भ्रष्टाचाराची कीड ठेचण्यास आणलेली ई-निविदा पद्धतही बोगस ठरली आहे़ हा भ्रष्टाचार उघड करणारी आॅडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे़ (प्रतिनिधी)घोटाळ्याचा नवीन पर्यायवॉर्डस्तरावरील ही कामे खिशात घालण्यासाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठेकेदार घोटाळे करीत असल्याचे दोन वर्षांपूर्वी उघड झाले़ त्यानंतर पालिकेने निविदा प्रक्रिया कठोर केली़ मात्र आता नगरसेवक आणि अधिकाऱ्यांशी संगनमत करून भ्रष्टाचार केला जात असल्याचे समजते़ निविदा मागे घेण्यासाठी तांत्रिक कारणेएखाद्या वॉर्डात ठेकेदाराने १० ते २० टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दाखविल्यास दुसरा ठेकेदार त्याहून कमी दराची निविदा भरतो़ त्यामुळे सर्वांत कमी बोली लावणाऱ्या ठेकेदाराला नियमानुसार कंत्राट मिळते़ टक्केवारीचे गणित जुळलेल्या ठेकेदाराला कंत्राट मिळवून देण्यासाठी स्थानिक अधिकारी व नगरसेवक सेटिंग लावतात़ यामध्ये कमी बोली लावणाऱ्या ठेकेदाराला निविदा मागे घेण्यास तांत्रिक कारण देऊन भाग पाडले जाते़