शहरं
Join us  
Trending Stories
1
जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता
2
भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!
3
५ गोष्टी कायम ध्यानात ठेवा, राहु-केतु महादशेत अपार लाभ मिळवा; अशुभ प्रभाव टाळण्यास काय कराल?
4
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
5
आजचा अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव
6
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
7
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
8
पतीने जबरदस्तीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, झाला खूप रक्तस्त्राव; २३ वर्षीय महिलेच्या मृत्यूने खळबळ
9
Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’
10
कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले
11
सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक
12
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
13
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
14
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
15
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
16
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
17
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
18
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
19
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
20
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य

ई प्रभाग कार्यालय आता रिजन्सी इस्टेटमध्ये

By admin | Updated: August 2, 2016 04:00 IST

२७ गावांच्या समावेशानंतर केडीएमसीच्या प्रभागांमध्ये भर पडलेल्या ई प्रभागाच्या कार्यालयाचे लवकरच स्थलांतर होणार आहे.

कल्याण : २७ गावांच्या समावेशानंतर केडीएमसीच्या प्रभागांमध्ये भर पडलेल्या ई प्रभागाच्या कार्यालयाचे लवकरच स्थलांतर होणार आहे. सद्य:स्थितीला डोंबिवलीमधील कै. ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलाच्या आवारात असलेले हे कार्यालय दावडी परिसरातील रिजन्सी इस्टेटमधील महापालिकेच्या जागेत हलवण्यात येणार आहे. जागेअभावी होणाऱ्या गैरसोयीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. १ जून २०१५ ला २७ गावांचा कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश करण्यात आला. त्यामुळे त्या गावांचा प्रशासकीय कारभार महापालिकेच्या माध्यमातून सुरू झाला. यासाठी ९ जून २०१५ रोजी ई प्रभागाची निर्मिती करण्यात आली. सार्वत्रिक निवडणुकीनंतर पडलेल्या प्रभाग रचनेत २७ गावांमधील १४ गावांचा समावेश ई प्रभागात झाला. यात एकूण १२ प्रभाग निर्माण झाले. सध्या ई प्रभागाचे कार्यालय डोंबिवलीतील महापालिकेच्या क्रीडासंकुलात आहे. परंतु, या ठिकाणची जागा अपुरी पडत असल्याने विद्युत, आपत्कालीन कक्ष, आरोग्य विभागाचा कारभार क्रीडासंकुलाच्या आवारातील ध्यानधारणा केंद्रातून चालवला जात आहे. त्यात नव्याने निवडून आलेल्या प्रभाग समिती अध्यक्षांनादेखील जागेअभावी कार्यालय उपलब्ध करून देता आलेले नाही. ही गैरसोय लक्षात घेता दावडी गावातील रिजन्सी इस्टेट परिसरातील महापालिकेच्या जागेत हे कार्यालय हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्थलांतराची प्रक्रिया अंतिम स्वरूपात आली असून आॅगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ई प्रभाग कार्यालयाचे स्थलांतर होईल, अशी माहिती नव्याने पदभार स्वीकारलेले प्रभागक्षेत्र अधिकारी प्रभाकर पवार यांनी दिली. (प्रतिनिधी)