शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात २ लाख वेळा खणखणला १०८

By admin | Updated: January 5, 2015 05:06 IST

शहर, अपघातग्रस्तांना गोल्डन अवर (एका तासाच्या आत) उपचार मिळणे गरजेचे असते. पण, रुग्णवाहिका बोलवण्यासाठी कुठे कॉल करायचा हे अनेकदा माहीत नसते

पूजा दामले, मुंबईशहर, अपघातग्रस्तांना गोल्डन अवर (एका तासाच्या आत) उपचार मिळणे गरजेचे असते. पण, रुग्णवाहिका बोलवण्यासाठी कुठे कॉल करायचा हे अनेकदा माहीत नसते, रुग्णवाहिका घटनास्थळी वेळेत पोहोचत नाही, अशामुळे अनेकदा अपघातग्रस्तांची प्रकृती गंभीर होते. हे टाळण्यासाठी २६ जानेवारी २०१४ रोजी महाराष्ट्र आणीबाणी वैद्यकीय सेवा (एमईएमएस) अर्थातच १०८ क्रमांक रुग्णवाहिकेसाठी सुरू करण्यात आला. वर्षभरात १०८ क्रमांकावर राज्यभरातून एकूण २ लाख ७ हजार २३ कॉल्स आल्याची माहिती एमईएमएसचे मुख्य संचालक अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली. अपघातग्रस्तांना एका तासाच्या आत योग्य ते उपचार मिळाल्यास त्यांच्या प्रकृतीत चांगल्या प्रकारे सुधारणा होऊ शकते. पण, वर्षभरापूर्वीपर्यंत रुग्णवाहिकेसाठी कोणताही एकच क्रमांक नसल्यामुळे अनेकदा अपघात स्थळी रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नसे. पण, १०८ या क्रमांकावर कॉल गेल्यास १० ते ३० मिनिटांच्या कालावधीत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचते. यामुळे अनेक अपघातग्रस्तांना याचा फायदा झाला आहे. २ लाख ७ हजार २३ कॉल्सपैकी १४ हजार ९७८ कॉल्स हे मुंबईतून आलेले आहेत, अशी माहिती शेळके यांनी दिली.वैद्यकीय गरज असताना सर्वाधिक म्हणजे एकूण १० हजार २६ कॉल्स मुंबईतून आले आहेत. तर त्याच्या खालोखाल १ हजार ८४९ कॉल्स हे गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यासाठी आले आहेत. ही सेवा फक्त अपघातग्रस्त व्यक्तींना रुग्णालयात नेण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. परंतु, तरीही प्रसूतीसाठी महिलांना रुग्णालयात नेण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर या क्रमांकाचा वापर केला जातो. (प्रतिनिधी)