शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

विधानपरिषदेतील धनंजय मुंडेच्या भाषणादरम्यान आमदाराच्या चक्क डुलक्या!

By admin | Updated: July 19, 2016 15:32 IST

कोपर्डी घटनेवरून धनंजय मुंडे विधानपरिषदेत चर्चा करत असताना राष्ट्रवादीचे यवतमाळचे आमदार संदीप बाजोरिया हे मात्र झोपा काढत होते.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील तरूणीवर बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यातील वातावरण तापलेले आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरूवात झाली असून या घटनेचे सभागृहात तीव्र पडसाद उमटले. याच मुद्यावरून विधानपरिषदेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे भाषण करत होते. कोपर्डी प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी घेतलेली दखल, तसेच राज्यातील सुरक्षा व्यवस्थेच्या मुद्यावरून ते बोलत असताना राष्ट्रवादीचे यवतमाळचे आमदार संदीप बाजोरिया हे मात्र सभागृहात झोपा काढत होते. स्त्रियांच्या सुरक्षेसारख्या इतक्या महत्वाच्या मुद्यावर चर्चा सूरू असतानाही आमदार साहेब मात्र निवांतपणे झोपले होते. चर्चा सुरू असताना बाजोरिया झोपल्याचे लक्षात आले असता त्यांना चिठ्ठी पाठवून बाहेर जाण्यास सांगण्यात आले. 
एकीकडे विरोधी पक्षाचा एक नेता या मुद्यावरून सरकारला धारेवर धरत असताना दुसरा नेता मात्र झोपा काढत असल्यामुळे विरोधकांना खरोखर या घटनेचं गांभीर्य आहे की फक्त ही घटना सरकारविरोधात मुद्दा म्हणून वापरला जात आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
 
विरोधकांना खरोखरचं कोपर्डीच्या घटनेचे गांभीर्य आहे का ? तुम्हाला काय वाटते?
 
 
धनंजय मुंडेच्या भाषणादरम्यान  डुलकी काढणारे बाजोरिया
 
 
 
 
चिठ्ठी पाठवून उठवण्यात आल्यानंतर बाजोरिया सभागृहाबाहेर पडले.
 
 
 
 
थोड्यावेळाने फ्रेश होऊन बाजोरियांनी पुन्हा आसन ग्रहण केले.
 
 
 
विरोधकांना खरोखरचं कोपर्डीच्या घटनेचे गांभीर्य आहे का ? तुम्हाला काय वाटते?