शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

कमी गर्दीच्या वेळी तुळजाभवनीच्या दर्शनासाठी महाद्वारातून प्रवेश

By admin | Updated: September 15, 2016 04:04 IST

श्री तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सव कालावधीत कमी गर्दीच्या वेळी भाविकांना राजे शहाजी महाद्वारातून प्रवेश देण्यात येईल, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सव कालावधीत कमी गर्दीच्या वेळी भाविकांना राजे शहाजी महाद्वारातून प्रवेश देण्यात येईल, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तसेच यासंदर्भात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार व शहर मंदिर संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांत बैठक घेऊन सन्मानजनक तोडगा काढावा, असे आदेशही त्यांनी दिले.मागील काही दिवसांपासून शहर संघर्ष समिती व जिल्हा प्रशासनात नवरात्रोत्सव कालावधीतील प्रवेश मार्गावरून वाद निर्माण झाला होता. अखेर मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या वादावर पडदा पडला. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी कागदपत्रांसह शहर संघर्ष समितीची बाजू मुख्यमंत्र्यांपुढे सादर केली. पूर्वी रस्ते अरूंद असतानाही भाविकांना महाद्वारातून प्रवेश दिला जात होता. आता तर शहर विकास प्राधिकरणामुळे हे रस्ते रूंद झाले आहेत. त्यामुळे महाद्वारातून प्रवेशाची शहर संघर्ष समितीची मागणी योग्य असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी देखील परंपरेनुसार महाद्वारातून प्रवेश देणे योग्य राहील, असे मत मांडले. यावर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सुरक्षिततेच्या कारणावरून हा निर्णय घेण्यात येणार होता, असे सांगून स्थानिक पातळीवर चर्चा करून योग्य मार्ग काढू, असे सांगितले. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत फडणवीस यांनी सर्वांची मते ऐकून घेऊन शेवटी भाविकांना कमी गर्दीच्या वेळी महाद्वारातून प्रवेश द्यावा, असे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. (प्रतिनिधी)