शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाला तडे

By admin | Updated: August 24, 2016 03:25 IST

लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दुर्गाडी देवीचे मंदिर वसलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजांना तडे गेल्याने तो ढासळण्याच्या बेतात आहे.

मुरलीधर भवार,

कल्याण- कल्याणची ओळख असलेल्या व लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दुर्गाडी देवीचे मंदिर वसलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजांना तडे गेल्याने तो ढासळण्याच्या बेतात आहे. दुर्गाडी देवीच्या मंदिराचा पाया घुशी आणि उंदीरांनी पोखरला आहे. वेळीच दुरुस्ती केली नाही तर मोठी दुर्घटना घडू शकते, असे स्थानिकांचे मत आहे. मात्र ज्या जिल्हाधिकारी कार्यालयाने याची दखल घ्यायची ते या दुरवस्थेकडे काणाडोळा करीत असल्याचाही आरोप केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना दुर्गाडी देवीच्या साक्षीने केली. तसेच १९५६ साली शिवाजी महाराजांनी कल्याण, भिवंडी आणि सूरत जिंकली. त्यावेळी दिवाळीचा दिवस होता. शिवाजी महाराजांच्या साक्षीने किल्ले दुर्गाडीवर दिवाळी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिरात एक शिळा आहे. तीच देवीची मूळ मूर्ती आहे. पुरातन काळी त्याचीच पुजा देवीचे भक्त करीत होते. नगरपालिकेच्या काळात तत्कालीन नगराध्यक्ष ना. का. अहिर यांनी दुर्गाडी किल्ल्यावर देवीचे मंदिर बांधले. सध्याचे तेच ते मंदिर आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी याठिकाणी देवीची पूजा बांधली होती. दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या दिवशी हिंदूना प्रवेश नाकारला जात असल्याच्या निषेधार्थ दिवंगत आनंद दिघे यांनी घंटानाद आंदोलन केले होते. आजही बकरी ईदच्या दिवशी शिवसैनिक घंटानाद करतात. मंदीर महापालिका हद्दीत असले तरी त्याची देखभाल दुरुस्ती करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयास दिला आहे. दुर्गाडी नवरात्र उत्सव समिती व शिवसेना शहर शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दुरुस्तीकरिता सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय दुर्लक्ष करीत आहे. १५ वर्षापूर्वी दुर्गाडीचे दोन्ही बुरुज ढासळण्याची घटना घडली होती. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची वाट न पाहता शिवसैनिकांनी बुरुजाची दुरुस्ती श्रमदानातून केली. त्याला तत्कालीन पोलीस उपायुक्त छेरिंग दोरजे यांनी अटकाव करीत ५६ शिवसैनिकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. दहा वर्षापूर्वी दुर्गाडीच्या दुरुस्ती देखभालीवर काही निधी जिल्हाधिकाऱ्यांनी खर्च केला. शिवसेनेचे महानगर प्रमुख विजय साळवी यांनी सांगितले की, यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. त्याची दखल जिल्हाधिकारी घेत नाही. >पावसाळयात मंदिराचे छत गळते आहे. मंदिराचा पाया उंदीर व घूशींनी पोखरला आहे. बुरुजाला तडे गेले आहेत. दोन वर्षापूर्वी माजी सेना नगरसेविका समीधा बासरे यांनी मंदिर देखभालीसाठी ठराव केला.या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कोणताही पाठपुरावा केला नाही. त्यामुळे मंदिर व किल्ला यांची दुरुस्ती व देखभाल रखडलेली आहे.वास्तविक पाहता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या कामासाठी निधी मंजूर करुन दुर्गाडी मंदिर व किल्ले यांची दुरुस्ती व देखभाल करण्याचे काम हाती घेणे आवश्यक आहे.