शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
5
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
6
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
7
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
8
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
9
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
10
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
11
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
12
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
13
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
14
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
15
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
16
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
17
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
18
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
19
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
20
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!

डम्पिंगचे आगसत्र सुरू

By admin | Updated: March 7, 2017 03:32 IST

उन्हाळ्याला प्रारंभ होताच येथील आधारवाडी डम्पिंगला आग लागण्यास सुरुवात झाली

कल्याण : उन्हाळ्याला प्रारंभ होताच येथील आधारवाडी डम्पिंगला आग लागण्यास सुरुवात झाली आहे. दुर्गाडी खाडीलगतच्या डम्पिंगच्या मागील बाजूस सोमवारी दुपारी लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात धुरांचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी आगीवर सायंकाळी उशिरा नियंत्रण मिळवले. दरम्यान, यासंदर्भात स्थानिक नगरसेवक व भाजपाचे गटनेते वरुण पाटील यांनी वारंवार लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नुकताच पत्रव्यवहार केला होता. परंतु, वास्तव पाहता त्यांच्याही पत्राला वाटाण्याच्या अक्षता केडीएमसी प्रशासनाने लावल्याचे पाहावयास मिळत आहे.पश्चिमेतील आधारवाडी डम्पिंगवर प्रतिदिन ६५० टन कचरा टाकला जातो. या डम्पिंगची क्षमता संपुष्टात आल्यानंतरही तेथे कचरा टाकणे सुरूच आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे एकीकडे ओव्हरफ्लो होत असलेल्या या डम्पिंगच्या दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवासी हैराण झाले असताना त्यातच उन्हाळ्यात कचरा पेटण्याचे सत्रही सुरूच असल्याचे पुन्हा सोमवारी समोर आले आहे. मागील वर्षी जानेवारीपासून आगी लागण्याचे सत्र सुरू झाले होते. ते मे महिन्यापर्यंत कायम होते. मोठ्या प्रमाणावर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आगीचा धूर वाऱ्याच्या प्रवाहाबरोबरच सभोवतालच्या परिसरात पसरतो आणि तेथील रहिवाशांना श्वास गुदमरणे, खोकला येणे, मळमळणे आदी त्रासाला सामोरे जावे लागते. आगीचे प्रमाण अधिक असेल, तर धुराचे लोट आधारवाडी परिसराबरोबरच नजीकच्या वाडेघर, खडकपाडा, लालचौकी, शिवाजी चौक, गौरीपाडा, पौर्णिमा चौकीपर्यंत पसरत जातात.दरम्यान, उन्हाळ्यात कचऱ्याला आगी लागण्याच्या घटना वारंवार घडतात. उन्हात कचरा तापतो. त्यात कचऱ्यामुळे निर्माण होणारा मिथेन वायू पेट घेतो. यामुळे आगी लागण्याच्या घटना घडतात. यावर उपाय म्हणून पाण्याच्या पाइपलाइन डम्पिंगमध्ये टाक ल्या जाणार आहेत. याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून वारंवार सांगितले जाते. आजवर यासंदर्भात ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे उन्हाळ्यात आगी लागण्याचे सत्र सुरूच राहण्याची दाट शक्यता आहे. (प्रतिनिधी)>यापूर्वीच्या घटना मागील वर्षी २, ११, ३१ जानेवारी, २१ मार्च आणि २८ मार्चला डम्पिंगला ागी लागल्याच्या घटना घडल्या होत्या. यानंतर ३१ मे ला लागलेली आग सलग तीन दिवस धुमसत होती.यापूर्वी २०१० मध्ये डम्पिंगला मोठी आग लागली होती. ३१ मे च्या आगीच्या घटनेच्यावेळी वाढती आग आणि धूर पाहता डम्पिंगला लागून असलेल्या साठेनगर वसाहतीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. यात तीन कचरावेचकही किरकोळ जखमी झाले होते.या वाढत्या घटना पाहता डम्पिंगवर मातीचा भराव टाकून आगीच्या घटनांवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्त ई. रवींद्रन यांनी डम्पिंगची पाहणी केली होती. साठेनगरमधील रहिवाशांचीही त्यांनी संवाद साधला होता. डम्पिंग बंद होण्यासाठी लागणारा दीड वर्षे लागणार असल्याने बायोगॅस प्रकल्पाद्वारे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचा दावा देवळेकर यांनी केला होता. परंतु, त्याचीही ठोस कार्यवाही झालेली नाही.