शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक बांधिलकीमुळेच पत्रकारिता टिकून

By admin | Updated: January 17, 2017 05:59 IST

पत्रकारितेने समाजाला नेहमी दिशा देण्याचे काम केले आहे

बीड : पत्रकारितेने समाजाला नेहमी दिशा देण्याचे काम केले आहे. वृत्तपत्रांचे अर्थशास्त्र अवघड आहे. मात्र, केवळ सामाजिक बांधिलकीमुळे पत्रकारिता टिकून आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांना स. मा. गर्गे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. सन्मानचिन्ह व १ लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री पंकजा मुंडे होत्या. तसेच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. रजनी पाटील, आ. जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, आदींची या वेळी उपस्थिती होती.अग्रलेख हा वृत्तपत्राचा आत्मा आहे; मात्र काही दैनिकांत त्याचा अभाव अशी खंत व्यक्त करीत राजकीय प्रवासात वर्तमानपत्रे कशी दिशादर्शक ठरली, याचे अनेक दाखले पवार यांनी दिले. ‘वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना एका वृत्तपत्राने ‘हे राज्य पडावे, ही श्रींची इच्छा’ अशा मथळ्याखाली अग्रलेख लिहिला. त्यानंतर मी काही सहकाऱ्यांसोबत ‘उद्योग’ केला अन् राज्य बदलले. त्यानंतर ‘वेडात दौडले वीर मराठे आठ’ अशा मथळ्याखाली अग्रलेख छापून आला. वृत्तपत्रांचे अर्थशास्त्र मला अजून कळले नाही. मात्र, केवळ विचार देण्याची भूमिका व सामाजिक बांधिलकी यामुळेच ही वृत्तपत्रसृष्टी टिकून आहे,’ असेही पवार पुढे म्हणाले. ‘वृत्तपत्रांद्वारे ज्ञानात भर पडते. मी विरोधी पक्षात असताना माझ्या भावना वृत्तपत्रांतून जशाच्या तशा उमटत होत्या. आता मात्र लेखणी व कॅमेऱ्याचा धाक वाटतो. आपले प्रतिबिंब आपल्याला ओळखू येत नाही. मात्र, वृत्तपत्रांतून ते प्रकट होते. या क्षेत्रात प्रगल्भ मंडळींची गरज आहे,’ असे पंकजा मुंडे या वेळी म्हणाल्या. (प्रतिनिधी)