शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतप ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
5
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
6
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
7
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
8
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
10
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
11
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
12
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
13
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
14
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
15
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
16
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
17
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
18
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
19
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
20
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश

अवकाळी पावसाने राज्यभरात तापमानात कमालीची घट

By admin | Updated: March 2, 2015 02:16 IST

राज्यासह मुंबईत शनिवारी पडलेल्या अवकाळी पावसाने कमाल आणि किमान तापमानात कमालीची घट नोंदवली आहे.

मुंबई : राज्यासह मुंबईत शनिवारी पडलेल्या अवकाळी पावसाने कमाल आणि किमान तापमानात कमालीची घट नोंदवली आहे. राज्यात रविवारी सर्वांत कमी तापमान महाबळेश्वर येथे १२.२ अंश सेल्सिअस एवढे, तर मुंबईचे किमान तापमान १८.६ अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले आहे. तर पुढील ४८ तासांत विदर्भ, मराठवाडा, कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्राला हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.उत्तर भारतात निर्माण झालेल्या पश्चिमी प्रकोपामुळे (वेस्टर्न डिस्टबर्न्स) राज्यासह मुंबईला शनिवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले असून, गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. शिवाय कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आणि मराठवाड्यासह विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागानुसार, विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंद झाले. शनिवारी मुंबईवर पाऊस घेऊन आलेल्या ढगांचे प्रमाण रविवारी मात्र कमी झाले होते. परिणामी, रविवारी मुंबईत कडाक्याचे ऊन पडले होते. शनिवारी झालेल्या पावसामुळे रात्रीच्या हवेत आलेला गारवा रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत कायम होता. मात्र नंतर पडलेल्या उन्हाने मुंबईकरांना पुन्हा चटके दिले. तर सूर्यास्ताच्या वेळी शहराच्या पश्चिमेला पुन्हा एकदा काळ्याकुट्ट ढगांची गर्दी झाल्याचे चित्र होते. आंब्यासह वीटभट्ट्यांचे नुकसानगेले दोन दिवस रायगडसह परिसरात पडलेल्या पावसाने शेतीसह, मासेमारी व वीटभट्टी व्यवसायाचे नुकसान केले. ऐन मोसमातच या पावसाचा आंबा पिकावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर खालापूर तालुक्यातील वीटभट्टीलाही फटका बसला आहे.ठाण्यात पावसाच्या हलक्या सरीठाणे जिल्ह्यात शनिवारपाठोपाठ रविवारीही अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पाहण्यास मिळाल्या. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्याचे चित्र दिसत होते. शहरात मागील २४ तास ७.५० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)