शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

स्थगिती हटवल्याने १२ कोटींचे उत्पन्न

By admin | Updated: June 23, 2016 04:18 IST

पुरेसे डम्पिंग ग्राउंड उपलब्ध न केल्याने व कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट न करणाऱ्या कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) हद्दीत बांधकाम करण्यास गेल्यावर्षी

मुंबई : पुरेसे डम्पिंग ग्राउंड उपलब्ध न केल्याने व कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट न करणाऱ्या कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) हद्दीत बांधकाम करण्यास गेल्यावर्षी उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती हटवल्याने महापालिकेला एका महिन्यात १२. ५२ कोटी रुपये महसूल मिळाला, अशी माहिती केडीएमसीच्या आयुक्तांनी उच्च न्यायालयाला दिली. तसेच आधारवाडी डम्पिंग ग्राउंड सध्या बंद करणे अशक्य असल्याची माहितीही आयुक्तांनी उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे दिली.आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला येथील नागरिकांचा विरोध आहे. घनकचरा व्यवस्थापन, २००० च्या नियमानुसार येथील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या जनहित याचिकेच्या सुनावणीवर न्यायालयाने गेल्यावर्षी केडीएमसीच्या हद्दीत नवीन बांधकामांना परवानगी न देण्याचे आदेश महापालिकेला दिले. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे महापालिका आर्थिक नुकसानीत असून, नागरिकांसाठी आवश्यक असलेले प्रकल्प आर्थिक चणचणीमुळे मार्गी लागणे शक्य नाही, असे म्हणत महापालिकेने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जावरील सुनावणीत उच्च न्यायालयाने एप्रिल महिन्यात नवीन बांधकामांना परवानगी देण्यास दिलेली स्थगिती हटवली. अगरवाल सोल्युशन्स प्रा. लि. व कृषि रसायन प्रा. लि या दोन्ही कंपन्यांना हे काम सोपवण्यात आले होते. तत्पूर्वी या दोन्ही कंपन्यांना नियमानुसार काही रक्कम अनामत म्हणून ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र या दोन्ही कंपन्यांनी दिलेल्या मुदतीत अनामत रक्कम जमा न केल्याने नव्याने निविदा काढण्यात येतील. त्यामुळे सध्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करणे शक्य नाही, असे पालिकेने न्यायालयाला सांगितले. त्याशिवाय घंटागाडी विकत घेण्याची व बायोगॅस युनिट सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही पालिकेने उच्च न्यायालयाला दिली. (प्रतिनिधी)