शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे मुंबईचा वेग मंदावला, रस्ते आणि लोकल सेवेवर परिणाम

By admin | Updated: July 29, 2016 11:28 IST

पावसाने रात्रीपासूनच लावलेल्या दमदार हजेरीमुळे मुंबईत काही ठिकाणी पाणी साचलं असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 29 - पावसाने रात्रीपासूनच लावलेल्या दमदार हजेरीमुळे मुंबईत काही ठिकाणी पाणी साचलं असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. रात्रभर कोसळणा-या पावसाची सकाळीही संततधार सुरु होती. रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून लोकल सेवेवरही परिणाम झाला आहे. मुंबईसह नवी मुंबई, ठाण्यातही पाऊस सुरु आहे. 
 
मुंबईतील वरळी, लालबाग लोअर परेल, दादर, माटुंगामध्ये पाऊस सुरु आहे. पश्चिम  उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली येथेही पावसाने हजेरी लावली आहे. शिवाय विक्रोळी, घाटकोपर, पवई, भांडुप, ठाणे, डोंबिवलीमध्ये पाऊस सुरु आहे. तसंच नवी मुंबईतील वाशी, पनवेलमध्येही जोरदार पाऊस सुरु आहे.
 
मध्यरात्रीनंतर पावसाने चांगलाच जोर पकडला. मुंबईत माटुंगा, हिंदमाता यांसारख्या सखल भागात पाणी साचलं आहे. पाणी साचलं असल्याने अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पाऊस असाच सुरु राहिल्यास ऐन कामाच्या वेळी मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. वांद्रे-वरळी सी लिंकवर मुसळधार पावसाने वाहनांचा वेग मंदावला आहे.
 
रेल्वे, रस्ते, विमान सेवेवर परिणाम
पावसामुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरु आहे. ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर मुंबईकडे जाणारी वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर बोरीवली ते वांद्रेदरम्यान तर ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर सायनपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली आहे. पावसामुळे विमानं उड्डाणंही रखडली आहेत. कमी दृश्यमानतेमुळे विमानं 15 ते 20 मिनिटं उशिरा उड्डाण करत आहेत. 
 
 
मालाडमध्ये मुसळधार पावसामुळे झाड कोसळून १ ठार
झाडाखाली चिरडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सुंदरनगर परिसरात शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. हा इसम मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना हा प्रकार घडला. मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठविण्यात आला असुन त्याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. तसेच अग्निशमन दलाचे जवान हे झाड हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. यात एका कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.